Year Ender 2024 : यंदाची तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीय का? 2024मध्ये बरेच फूड हॅक ट्रेंडिंगमध्ये होते. लोकांनी त्यांना पसंती दिली होती. इंटरनेटवर रोज असं काही व्हायरल होतंय की त्यामुळे आपण आश्चर्यचकीत होतो. तर कधी कधी आपल्या पदरी निराशा येते. हे वर्ष जसजसं संपत येत आहे, आपण तसतसं नव्या वर्षाच्या जवळ जात आहोत. त्यामुळे यंदाच्या वर्षी ट्रेंडिंगमध्ये असलेल्या फूड हॅक्सची आज आपण माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हालाही त्याची पुन्हा एकदा माहिती मिळेल.
तेलाच्या पॅकेटमधून बॉटलमध्ये तेल ओतताना तेलाचा एकही थेंब गळू न देण्याचा हा हॅक जोरदार व्हायरल झाला होता. स्वयंपाक घरात तर हा एक अतिशय उपयुक्त आणि लोकप्रिय हॅक बनला आहे.
घराघरात एक सामान्य समस्या म्हणजे ताजे हर्ब्स लवकर खराब होणे, विशेषत: कडीपत्ता. इंस्टाग्राम यूजर @twinsbymyside ने ताज्या कडीपत्त्यांना 6 महिने ताजं ठेवण्याचा सोपा उपाय दाखवला आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर करून कडीपत्ता ताजा ठेवण्याची ट्रिक्स दाखवली आहे. तो व्हिडीओ जरूर पाहाच.
मशरूम किचनमधील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. त्यापासून विविध स्वादिष्ट डिशेस तयार केल्या जातात. पण त्यामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असल्यामुळे, त्यांना योग्य प्रकारे शिजवताना तो ओलसर आणि ब्राऊन होऊ शकतो. डिजिटल क्रिएटर कॅथलीन एशमोर यांनी मशरूमच्या परफेक्ट कुकिंगसाठी स्टेप-बाय-स्टेप टिप्स दिल्या आहेत. त्या फॉलो केल्यास मशरूम ओलसर होणार नाही.
लसूण प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो आणि त्याचा वापर अनेक डिशेसमध्ये होतो. पण लसूण सोलणे एक आव्हानात्मक काम असू शकते. 2024 मध्ये एका व्हायरल व्हिडिओने लसूण सोलण्याचा सोपा आणि जलद उपाय दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही झटक्यात लसूण सोलू शकता.
कधी कधी भाजीमध्ये खूप तेल जास्त होऊन जाते, आणि ते काढणे गरजेचे असते. 2024 मध्ये एकe व्हायरल व्हिडिओमध्ये डिजिटल क्रिएटर दीप्ती कपूर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पॅनला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवले की अतिरिक्त तेल एका कापडात गोळा होऊन भाजी हेल्दी होऊ शकते.