दिल्ली : जगातील सर्वांत प्रसिद्ध नायगारा धबधब्याचे( Niagara Falls) सौंदर्य अगदी अनुभवता येणार आहे. नायगारा धबधब्याजवळील ह्यूपॉइंटवर पोहचण्यासाठी 2200 फूट लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांसाठी ही खास पवर्णी ठरणार आहे.
नायगारा धबधब्या पर्यंत रोहचण्यासाठी नवे भुयार सुरू करण्यात आले. तब्बल 2200 फूट लांबीचे हे भुयार आहे. यामुळे पर्यटकांना अनोख्या पद्धतीने धबधब्याचे हे सौंदर्य अनुभवता येणार आहे.
या 2,200 फूट लांबीच्या भुयारातून मार्गक्रमन करत पर्यटक नायगारा धबधब्याच्या ह्यूपॉइंटवर पोहोचतील, जेथून पूर्ण धबधबा दिसणार आहे. येथे काही काळ थांबण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे धबधब्याचे दृश्य रोमाचंक ठरावे म्हणून काचेचे पॅनेल असणारी लिफ्ट देखील बसविण्यात आली आहे. ही लिफ्ट नायगारा पार्क पॉवर स्टेशनपासून 180 फूट खाली भुयारापर्यंत नेते. याच लिफ्टमधून भुयारात पोहोचता येते.
नायगारा धबधबा कॅनडात ओंटारियो आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्कदरम्यानच्या सीमेत विस्तारलेला आहे. येथून वाहणाऱ्या 3 झऱ्यांपैकी सर्वांत मोठा हॉर्स शू फॉल्स आहे, ज्याला कॅनेडियन फॉल्सदेखील म्हटले जाते. याचबरोबर वाहणाऱ्या 2 अन्य धबधब्यांचे नाव अमेरिकन फॉल्स आणि ब्रायडल व्हिल आहे.
हा धबधबा अमेरिकेतील नायगारा नदीवर असून अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या सीमांना लागून आहे. न्यू जर्सीपासून नायगारा साधारण ४०० मैल दूर असून अमेरिकेतील बफेलो या शहराच्या जवळ आहे. या धबधब्यातून प्रत्येक मिनिटाला 40 लाख चौरस फूट (की घनफूट? ) पाणी कोसळते. यामुळेच नायगारा धबधबा हा जगातील सर्वांत मोठ्या धबधब्यांपैकी एक मानला जातो. याची उंची 167 फूट आहे.