घरच्या घरी करा फ्रूट फेशियल, या टिप्स करा फॉलो, मिळेल ग्लोईंग त्वचा

| Updated on: Apr 28, 2021 | 8:21 AM

फळे अँटीऑक्सिडंट आणि अद्भुत पोषक तत्वांनी युक्त असतात जे आपल्या त्वचेला चमत्कारीक फायदे देतात. (5 Easy Ways To Make Fruit Facials At Home, If You Follow These Tips, Your Skin Will Glow)

घरच्या घरी करा फ्रूट फेशियल, या टिप्स करा फॉलो, मिळेल ग्लोईंग त्वचा
घरच्या घरी करा फ्रूट फेशियल
Follow us on

मुंबई : त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा फेशियल करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपण जवळच्या ब्युटी सलूनमध्ये किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हे करु शकता. मात्र सलूनमध्ये जाऊन प्रोडक्ट्स खरेदी करणे पॉकेट-फ्रेंडली नसते. यामुळे आपण आपल्या घरातच फ्रूट फेशियल करुन तजेलदार त्वचा मिळवू शकता. फळे अँटीऑक्सिडंट आणि अद्भुत पोषक तत्वांनी युक्त असतात जे आपल्या त्वचेला चमत्कारीक फायदे देतात. (5 Easy Ways To Make Fruit Facials At Home, If You Follow These Tips, Your Skin Will Glow)

स्टेप 1 : आपली त्वचा दूधाने साफ करा

आपली त्वचेवर जमा झालेली सर्व घाण काढून टाकण्यासाठी आपल्याला सखोल स्वच्छतेची आवश्यकता असते. आपण आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी थंड, कच्चे दूध वापरु शकता कारण ते छिद्रांसाठी चांगले कार्य करते. आपल्याला फक्त आपला चेहरा पाण्याने धुवायचा आहे आणि नंतर एक वाटी थंड दूध घ्यावे. आपल्या चेहर्‍याला आणि गळ्याला दूध लावण्यासाठी कापसाचा बोळा वापरा. हे 10 मिनिटे असेच ठेवा आणि नंतर ते कोमट पाण्याने धुवा.

स्टेप 2 : लिंबाच्या सालीने आपली त्वचा एक्सफोलिएट करा

त्वचेवरील सर्व घाण काढून टाकल्यानंतर त्वचेवरील मृत पेशी काढणे देखील आवश्यक आहे. आपली त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी आपल्याला दाणेदार स्क्रबची आवश्यकता आहे. सुकलेल्या लिंबाची साले वापरुन आपण नैसर्गिक स्क्रब बनवू शकता. आपल्याला फक्त लिंबाची साल पाण्यासोबत वाटून पेस्ट बनवायची आहे. आपल्या डोळ्याजवळचा भाग टाळण्यासाठी ही पेस्ट गोलाकार मोशनमध्ये लावा. ही प्रक्रिया सुमारे 5 मिनिटे सुरू ठेवा. यामुळे त्वचेतील मृत पेशी हळुवारपणे दूर होतील. आपला चेहरा पुन्हा साध्या पाण्याने धुवा.

स्टेप 3 : वाफेने छिद्र ओपन करा

छिद्र ओपन करणे निश्चितच एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण दररोज त्वचेवर घाण वाढत असते. फेशियल स्टीमरचा वापर करुन आपल्या त्वचेवरील छिद्र ओपन होण्यास मदत होईल. आपल्याकडे चेहऱ्याचा स्टीमर नसल्यास आपण एका भांड्यात पाणी उकळून घ्या. नंतर आपल्या डोक्यावर कपडा किंवा टॉवेल ठेवून वाफ घेऊ शकता. सुमारे 10 मिनिटे वाफ घ्या आणि नंतर सुक्या कपड्याने आपला चेहरा पुसून घ्या. यामुळे आपल्याला ब्लॅकहेड्सपासून मुक्त करण्यास मदत मिळेल.

स्टेप 4 : फळांचा पॅक बनवा

फ्रूट पॅक बनवणे अगदी सोपे आहे. तथापि आपल्या त्वचेनुसार पॅक बनवणे आवश्यक आहे.

ड्राय फेस : जर आपण ड्राय फेसने त्रस्त असाल तर स्मॅश केलेले केळे आणि मधाचा बनवा.

अँटी-एजिंग : जर आपल्याला फर्म आणि सुरकुत्या मुक्त त्वचेसाठी पॅक हवा असेल तर पपईचा लगदा आणि मधाचा पॅक बनवा.

तेलकट त्वचा : जर आपली त्वचा तेलकट आणि डागयुक्त असेल तर जामुन आणि लिंबाच्या रसाचा पॅक बनवा.

स्टेप 5 : फळांचा पॅक लावा

आपल्या त्वचेनुसार बनवलेला फेस पॅक चेहर्‍यावर आणि गळ्याला हळू हळू लावा आणि आपल्या बोटांच्या दबावाने चेहर्‍यावर मालिश करा. त्वचेवर हलका दबाव द्या आणि चेहऱ्याच्या वरच्या दिशेने मालिश करा. 5 मिनिटे आपल्या चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर 10 मिनिटे पॅक तसेच राहून द्या. आणखी रिफ्रेशिंग परिणामासाठी आपण काकडीच्या स्लाईस डोळ्यावर ठेवा. त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा धुवा. (5 Easy Ways To Make Fruit Facials At Home, If You Follow These Tips, Your Skin Will Glow)

इतर बातम्या

Jio कडून 41 कोटी युजर्सला अलर्ट, मोफत मिळण्याच्या अमिषाने ‘ही’ चूक करु नका, नाहीतर मोठा भुर्दंड

”कोरोनापासून बचावासाठी दारूची दुकाने बंद करा, 30 हजार कोटींपेक्षा जास्त जीव वाचणार”