ऑफिसमध्ये तासन्तास एसीमध्ये बसल्याने, त्वचा होते कोरडी.. ‘या’ सर्वोत्तम टिप्सची घ्या मदत!

| Updated on: Jul 07, 2022 | 11:52 PM

दिवसभर ऑफिसमध्ये एसीच्या खोलीत बसल्याने, तुमची त्वचा कोरडी होण्यास सुरूवात होते. काही ब्युटी टिप्सचा वापर करून, तुम्ही कमी वेळेतही तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी राखू शकता. जाणून घ्या, यासाठी सर्वोत्तम टिप्स.

ऑफिसमध्ये तासन्तास एसीमध्ये बसल्याने, त्वचा होते कोरडी.. ‘या’ सर्वोत्तम टिप्सची घ्या मदत!
स्कीन केअर
Image Credit source: Google
Follow us on

धावपळीच्या जीवनात, त्वचेची असो किंवा आरोग्याची. काळजी घेणे खूप कठीण होऊन बसते. लोक त्वचा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात आणि त्यामुळे अनेक समस्या आपल्याला वेळेपूर्वीच त्रास देतात. त्वचेच्या काळजीबद्दल बोलायचे झाले तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बहुतेकांना कोरड्या त्वचेची समस्या (Dry skin problems) उद्भवू लागते. तासन्तास एसीमध्ये बसणे आणि कमी पाणी पिणे हे यामागचे कारण असू शकते. तज्ज्ञांच्या मते, त्वचेवरील कोरडेपणावर उपचार केले नाहीत तर त्यामुळे त्वचाही निर्जीव (Inanimate) दिसू लागते. एवढेच नाही तर त्वचेवर रॅशेस आणि बारीक रेषा येण्याचाही धोका असतो. आजकाल केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही अकाली वृद्ध दिसण्याची समस्या भेडसावत आहे. यासाठी ऑफिसमध्ये राहूनही त्वचेची काळजी (Skin care) घेणे गरजेचे आहे. काही सोप्या आणि सर्वोत्तम टिप्स फॉलो करून तुम्ही या परिस्थितीत त्वचेची चांगली काळजी घेऊ शकता.

जास्तीत जास्त पाणी प्या

जर तुम्ही दिवसभर योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केले तर ते तुमच्या त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवते आणि त्वचेची पीएच पातळी देखील संतुलित राहते. तसेच जास्त पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. विशेष म्हणजे पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे रोज किमान 3 लिटर पाणी प्या.

केमिकलपासून दूर रहा

कोरोनामुळे लोकांनी हँड सॅनिटायझर आणि इतर रासायनिक गोष्टींना जीवनाचा आणि नित्यक्रमाचा भाग बनवले आहे. हे कोरोनाच्या धोकादायक विषाणूपासून तुमचे संरक्षण करू शकते, परंतु त्यात असलेले अल्कोहोल त्वचा कोरडी करू शकते. हे अल्कोहोल त्वचेवरील ओलावा काढून टाकते आणि त्वचा अधिक कोरडी होते.

हे सुद्धा वाचा

कोरफड जेलचा वापर करा

कोरफड हा असाच एक घटक आहे, जो केवळ त्वचेसाठीच नाही तर आरोग्य आणि केसांसाठीही फायदेशीर मानला जातो. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि इतर गुणधर्म आहेत, जे त्वचेला दुरुस्त करण्याव्यतिरिक्त, त्यात आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करतात. उन्हाळा असो किंवा हिवाळा, कोरफड जेल कोणत्याही ऋतूत नैसर्गिकरीत्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करते. विशेष म्हणजे यामुळे उन्हाळ्यात त्वचेवरील सनबर्न सहज दूर होतो. कोरफडीपासून बनवलेला जेल ऑफिसमध्येही त्वचेवर लावून तुम्ही त्वचेचे सौदर्यं कायम ठेवू शकता.