मुंबई : आरोग्यवर्धक आवळा खाण्याचे बरेच फायदे आहेत आणि आवळा शक्य तितके खावे, असे नेहमीच म्हटले जाते. परंतु, आवळा खाण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. सामान्यत: अनेक रोग बरे करण्यासाठी आवळा औषध म्हणून वापरला जातो. त्यातील औषधी घटक शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात. परंतु, जर त्याचा अधिक वापर केला तर ते आपल्या शरीरास हानी देखील पोहोचवू शकते. म्हणूनच आपण आवळ्याचे सेवन योग्य प्रमाणातच करणे महत्त्वाचे आहे. तसेच, कुठल्याही प्रकारे सेवन करण्यापूर्वी आपली डॉक्टरांचा किंवा कोणत्याही आहारतज्ज्ञांच्या सल्ला अवश्य घ्यावा (Amla Side effects on human body).
जर, तुम्ही आवळा आणि आले यांचे एकत्र सेवन केले, तर त्याचा तुमच्या यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. आवळ्याचे जास्त सेवन केल्याने आपल्या यकृतामध्ये एसजीपीटी म्हणजेच सीरम ग्लूटामिक पायरुविक ट्रान्समिनेजची मात्रा वाढते. यामुळे, आपल्या पाचन तंत्रामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
आवळा नैसर्गिकरित्या आम्लीय आहे. म्हणून आवळ्याच्या अधिक सेवनाने पोटाचा त्रास होऊ शकतो. विशेषत: जर, तुम्ही ते रिक्त पोटी आवळा खाल्ला तर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते (Amla Side effects on human body).
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर शरीरासाठी फायदेशीर असते. परंतु, जास्त प्रमाणात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या देखील निर्माण होऊ शकते. आवळा जास्त खाल्ल्याने शौचास त्रास होतो. जर तुम्ही दररोज आवळा खात असाल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणीही प्यावे जेणेकरून, तुम्हाला बद्धकोष्ठतासारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
उच्चरक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्येने ग्रस्त व्यक्तींनी चुकूनही आवळ्याचे सेवन करू नये. यामुळे शरीरात सोडियमची पातळी वाढते, ज्यामुळे मूत्रपिंड त्याचे कार्य योग्यरित्या करण्यास असमर्थ ठरतो. यामुळे, शरीरात पाणी साठण्यास सुरुवात होते आणि उच्च रक्तदाबची समस्या सुरू होते.
आवळा हे फळ व्हिटामिन सीने समृद्ध आहे. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्र मार्गात जळजळ होऊ शकते. बर्याच लोकांना मूत्र मार्गासंबंधित इतर समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.
(Amla Side effects on human body)
Aloe Vera Side Effects | ‘कोरफड’ सेवन करताय? थांबा! ‘या’ गोष्टी जाणून घ्या, अन्यथा वाढू शकते समस्या…https://t.co/LRY9vWohKB#AloeVera #sideeffects
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020