उन्हाळ्यात त्वचेला खाज येतेय? कोरफड जेल सोबत लावा ‘ही’ गोष्ट

| Updated on: Mar 23, 2025 | 2:11 PM

उन्हाळा येताच त्वचेच्या समस्याही सुरू होतात. उन्हाळ्यात अनेकदा काही लोकांना त्वचेवर खाज येण्याची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत, यातून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत. पण जर तुम्ही कोरफडीमध्ये या काही गोष्टी मिसळून लावल्या तर तुम्हाला खाज सुटण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

उन्हाळ्यात त्वचेला खाज येतेय? कोरफड जेल सोबत लावा ही गोष्ट
aloe vera
Image Credit source: Instagram
Follow us on

उन्हाचा तडाखा ऐवढा वाढला आहे की अनेकांना त्वचेच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. कारण तीव्र सुर्यप्रकाशामुळे येणारा घाम आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे त्वचा कोरडी, चिकट तर होतेच पण त्यासोबत त्वचेला खाज सुद्धा येते. या हंगामात त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ होणे आणि खाज येणे या समस्या सामान्य असले तरी यावर उपचार करणे तितकेच महत्वाचे आहे. तुम्हालाही उन्हाळ्यात त्वचेवर खाज येत असेल तर तुम्ही नैसर्गिक उपायांचा अवलंब करा.

जेव्हा त्वचेची काळजी घेण्याचा विचार येतो तेव्हा कोरफड जेलचे नाव सर्वात आधी येते. कोरफडीमध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणूरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेला शांत करतात आणि खाज कमी करण्यास मदत करतात. पण तुम्ही या जेलमध्ये जर काही खास गोष्टी मिक्स करून लावल्या तर त्याचा परिणाम आणखी चांगला होईल. उन्हाळ्यात त्वचेवर खाज येण्याची समस्या सतावत असेल तर कोरफडी जेलमध्ये कोणत्या गोष्टी मिक्स करून लावाव्यात ते जाणून घेऊया.

उन्हाळ्यात त्वचेची खाज येण्याची समस्या सतावत असेल तर कोरफडीत या गोष्टी मिक्स करा

कोरफड आणि कडुलिंबाची पाने

कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचेवरील संक्रमण आणि खाज दूर करण्यास मदत करतात. सर्वप्रथम, 10-15 कडुलिंबाची पाने बारीक करून पेस्ट बनवा. त्यात 2 चमचे ताजे कोरफडीचे जेल मिक्स करा. हे मिश्रण त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने त्वचा धुवा.

हे सुद्धा वाचा

कोरफड आणि हळद

हळद नैसर्गिकरित्या अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे त्वचेवरील खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला 1/2 चमचा हळद पावडर घ्यावी लागेल. नंतर त्यात 2 चमचे कोरफड जेल मिक्स करा. ते त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.

कोरफड आणि गुलाबपाणी

गुलाबपाणी त्वचेला थंड करते आणि खाज कमी करण्यास मदत करते. यासाठी 2 चमचे कोरफड जेलमध्ये 1 चमचा गुलाबपाणी मिसळा. खाज येत असलेल्या भागावर ते हळूवारपणे लावा. त्वचा हे मिश्रण चांगल्या प्रकारे शोषून घेईल आणि खाज येण्याच्या समस्या कमी होईल.

कोरफड आणि नारळ तेल

नारळाचे तेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते आणि खाज कमी होण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला 1 चमचा शुद्ध नारळ तेलात 2 चमचे कोरफड जेल मिसळावे लागेल. यानंतर झोपण्यापूर्वी खाज येण्याच्या भागावर हे मिश्रण लावा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

कोरफड आणि काकडीचा रस

जळजळ आणि खाज कमी करण्यासाठी काकडी हा देखील एक चांगला पर्याय आहे. काकडीचा रस त्वचेला थंडावा देतो आणि जळजळ कमी करतो. यासाठी तुम्हाला फक्त 1चमचा काकडीचा रसात 2 चमचे कोरफड जेल मिक्स करा. नंतर हे मिश्रण त्वचेवर लावा आणि तसेच राहू द्या आणि २० मिनिटांनी धुवा.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)