मुंबई : प्रत्येक जण महिला असो वा पुरुष आपल्या त्वचेची काळजी घेतात. चमकदार चेहऱ्यासाठी ते फेशियल करतात. लग्न, समारंभ, जीवनातील खास क्षण, पार्टी यासाठी आपण छान दिसण्यासाठी पार्लरमध्ये जातात. बाजारात मिळणारे सौदर्यं प्रसाधने वापरतात. पण हे केमिकलयुक्त प्रसाधने आपल्या त्वचेचं नुकसान करतात. लोकांचा आता नॅचलर गोष्टींकडे कल वाढलेला दिसतोय. घरगुती गोष्टी वापरुन आपल्या त्वचेची (Skin) काळजी घेतली जातेय. चमकदार चेहऱ्यासाठी तुमच्या किचनमध्ये असलेलं एक साहित्य खूप फायदेशीर आहे. ते तुमच्या किचनमध्ये कायम असतं. टोमॅटो (Tomato) हो…बरोबर घरगुती टोमॅटोचा फेस पॅक (Homemade Tomato Face Pack) आपल्या त्वचा चमकदार करते. टोमॅटोमध्ये असलेले गुणधर्म आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सडंट्स आहेत जे आपल्या त्वचेसाठी फायद्याचे आहे. तर टोमॅटोचे वेगवेगळे फेस पॅक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे झाले फेस पॅक तुम्ही टोमॅटोपासून घरच्या घरी फेशियल करु शकता.
टोमॅटो क्लीन्जर
पिकलेल्या टोमॅटोचा रस घ्या. त्यात कडुनिंबाच्या पानाचे पावडर मिक्स करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर 2 ते 3 मिनिटं मसाज करा. या मिश्रणाने त्वचा स्वच्छ होते.
टोमॅटोचा स्क्रब
आता या स्क्रबसाठी टोमॅटोचा रस आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं मसाज करा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा.
टोमॅटो पॅक
आता स्क्रब केल्यावर टोमॅटोचा फेस पॅक लावा. यासाठी टोमॅटो आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक लावा. सुकल्यावर ते थंड पाण्याने धुवून टाका.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
संबंधित बातम्या :
वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा दररोजच्या आहारात समावेश करा!
वजन कमी करायचे आहे? तर या ‘पाच’ सवयींना बनवा तुमच्या आयुष्याचा भाग; जाणून घ्या फायदे
Weight Loss आणि प्रोटीनची कमी भरुन काढण्यासाठी या हिरव्या भाज्या आहारात असायलाच हव्या