रिप्रोडक्टिव हेल्थ (Reproductive Health) राखण्यासाठी, प्रत्येक स्त्रीने स्त्रीरोगतज्ञांकडे जाऊन तिची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. पण अशा अनेक महिला आहेत ज्या, आपल्या लैंगिक आरोग्याबद्दल (About sexual health) सांगण्यास टाळाटाळ करतात. जिव्हाळ्याच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांशी उघडपणे न बोलणे काही वेळा तुमच्यासाठी खूप महागात पडू शकते. अशा स्थितीत स्त्रीरोग तज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही कोणतीही लाज न बाळगता उत्तरे देणे गरजेचे आहे. तपासणी दरम्यान, स्त्रीरोगतज्ञ तुम्हाला तुमच्या खासगी आरोग्यासंबंधी विविध प्रश्न विचारू शकतात. आमच्या कडून त्या प्रश्नांबद्दल जाणून घ्या ज्यांची उत्तरे तुम्ही न घाबरता देणे फायदेशीर ठरेल. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या (Gynecologists) काही प्रश्नांची तुम्ही स्पष्ट उत्तरे देणे खूप गरजेचे आहे. स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांच्या या 7 प्रश्नांची उत्तरे न देणे महिलांच्या वैय्यक्तीक आरोग्याला घातक ठरु शकते.
डॉक्टरांचा हा प्रश्न तुम्हाला मूर्खपणाचा वाटत असला तरी. पण, या प्रश्नाच्या उत्तराच्या आधारे डॉक्टर ठरवतात की, तुम्हाला कोणत्या चाचण्या करायच्या आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही डॉक्टरांशी शेअर केलेल्या माहितीनुसार तुमची काळजी घेतली जाते.नंतर गरज पडल्यास नेमके उपचार करण्यात येतात.
या प्रश्नाचे उत्तर देण्यास महिला अनेकदा संकोच करतात. जर तुम्ही गेल्या 15 वर्षांपासून एकाच जोडीदारासोबत राहत असाल, तर डॉक्टर तुम्हाला एसटीडी(STD) चाचणी न घेण्याचा सल्ला देऊ शकतात. पण जर तुम्ही एकाच महिन्यात तीन वेगवेगळ्या लोकांसोबत सेक्स केला असेल तर डॉक्टर तुम्हाला एसटीडी टेस्ट करायला सांगू शकतात.
महिलांमध्ये नियमित मासिक पाळी चक्र 28 दिवसांचे असते. तारखेपासून तीन ते चार दिवसांनी मासिक पाळी येणे सामान्य आहे, परंतु जर हे अंतर जास्त असेल तर त्याला अनियमित मासिक पाळी म्हणतात. मासिक पाळी नियमित न येणे काही वेळा गंभीर असू शकते. असे झाल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
सेक्स करताना किंवा नंतर कधी कधी तुमच्या योनी किंवा श्रोणीत वेदना होत असतील तर घाबरण्याची गरज नाही. तथापि, जर तुम्हाला सेक्स दरम्यान किंवा नंतर प्रत्येक वेळी वेदना होत असतील. तर तुम्ही डॉक्टरांना भेटावे. यासाठी, डॉक्टर तुम्हाला मूलभूत योनिमार्गाच्या संसर्गाची किंवा एंडोमेट्रिओसिसची चाचणी करवून घेण्यास सांगू शकतात.
अनेक स्त्रिया या प्रश्नाचे उत्तर देण्यास संकोच करतात. त्यामुळे अनेक वेळा डॉक्टरही महिलांना हे प्रश्न विचारत नाहीत. पण तुमच्या योनीतून स्त्राव, रंग, उग्रवास यात अचानक बदल होत असेल तर ते बॅक्टेरियाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. या समस्येचा सामना करणे खूप सोपे असले. तरी, यासाठी तुम्हाला डॉक्टरांना याबद्दल खुलेपणाने सांगावे लागेल.
वैयक्तीक जीवनाबद्दल बोलताना डॉक्टर अनेकदा महिलांना हा प्रश्न विचारतात, परंतु जर तुमचे डॉक्टर हा प्रश्न विचारत नसतील, तर, तुम्ही इतर चांगल्या डॉक्टरांकडे जाणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला गर्भनिरोधकांच्या सुरक्षित पद्धती सांगणे आणि तुम्हाला मदत करणे हे स्त्रीरोगतज्ञाचे काम आहे. अशा परिस्थितीत गर्भनिरोधकांसाठी तुम्ही कोणत्या पद्धतींचा अवलंब करता? तुमच्या डॉक्टरांना याबद्दल सांगा जेणेकरून ते तुम्हाला सर्व पर्याय निवडण्यात मदत करू शकतील.
प्रत्येक स्त्रीने स्वत:च्या स्तनाची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला तसे करण्याची आठवण करून देणे हे तुमच्या डॉक्टरांचे काम आहे. योग्य तपासणीसाठी डॉक्टर तुम्हाला आणखी बरेच प्रभावी मार्ग सांगू शकतात.