Numerology : अत्यंत भावनिक स्वभावाचे असतात ‘या’ मुलांकाचे लोकं; लोकांकडून घेतला जातो फायदा

| Updated on: Mar 15, 2025 | 10:44 AM

Which Mulank Is Emotional In Numerology : मुलांकाला अंकशास्त्रात अत्यंत महत्व आहे. अंकशास्त्रात मुलांकावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य, दुसऱ्या मुलांकासोबतची वर्तणूक अशा सगळ्या गोष्टी समजू शकतं. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मुलांक कळतो.

Numerology : अत्यंत भावनिक स्वभावाचे असतात या मुलांकाचे लोकं; लोकांकडून घेतला जातो फायदा
Mulank 2
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अंकशास्त्रात मुलांकला खूप महत्व देण्यात आलेलं आहे. मूळ संख्या 01 ते 09 पर्यंत आहेत. मग उदाहरणार्थ जर तुमचं जन्म कोणत्याही महिन्याच्या 12 तारखेला झालेला असेल, तर 1 व 2 ची बेरीज करून मिळणारा अंक तुमचं मुलांक मानला जातो. म्हणजेच 1+2=3 म्हणजे तुमचा मुलांक 3 आहे. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक हा 1 असेल. याच अंकशास्त्रात एक असा मुलांक आहे, ज्या मुलांकाची व्यक्ती ही फार भावनिक असते. त्यांच्या भावनाप्रधान स्वभावाचा फायदा बऱ्याचवेळा घेतला जातो. त्यामुळे त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं.

कोणता मुलांक असतो भावनाप्रधान?

अंकशास्त्रात मुलांक 2 हा सर्वात जास्त भावनिक असलेला मुलांक मानला गेला आहे. या मुलांकाचा स्वामी हा चंद्र ग्रह असतो. कोणत्याही महिन्याच्या 02, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक हा 2 मानला जातो. या तारखेला जन्मलेले आणि मुलांक 2 असलेले माणसं हे खूप भावनिक असतात. तसंच प्रत्येक गोष्ट मनाला लाऊन घेणारे असतात. स्वभावाने देखील या मुलांकाच्या व्यक्ती शांत असल्याचं बघायला मिळतं.

या व्यक्ती भावनिक असल्याने, एखाद्यावर खूप लवकर विश्वास ठेवतात. ज्यामुळे त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. बऱ्याच वेळा, भावनांमध्ये वाहून जाऊन, हे लोक जोडीदार निवडण्यात देखील चुका करतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रेम जीवनात विश्वासघाताचा सामना करावा लागतो. भावनिक असल्याने, हे लोक खूप जास्त विचार करतात. जास्त वेळ विचारात घालवल्याने त्यांना नुकसान देखील होते. यांच्या भावनिक स्वभावाचा फायदा देखील काही वेळा इतरांकडून घेतला जातो.

मुलांक 2 च्या व्यक्ती असतात खास..

2 या मुलांकाचे लोक हे खूप धीराचे असतात आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देतात. हे लोक खूप हुशार असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात प्रचंड यश मिळते. नोकरीत देखील बुद्धीच्या जोरावर ते प्रगती करतात. तसेच, त्यांना कोणत्याही बंधनात अडकणे आवडत नाही आणि ते स्वतःच्या इच्छेचे स्वामी असतात. 2 अंक असलेल्या लोकांना त्यांच्या भविष्यासाठी पैसे कसे वाचवायचे हे देखील चांगले माहित असते.