नवी दिल्ली | 8 ऑगस्ट 2023 : गॅसेसच्या त्रासामुळे (gas problem) बऱ्याच वेळेस त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटते आणि लाजिरवाणी परिस्थितीही उद्भवू शकते. ज्यांना हा त्रास वारंवार होतो, ते त्यापासून बचावासाठी अनेक औषधे, चूर्ण यांचा वापर करतात. पण त्यापासून आराम हवा असेल तर गॅस होण्याचे मूळ कारण समजून उपाय करायला हवा. खरंतर असे अनेक पदार्थ असतात, जे पाचनक्रियदेरम्यान अतिरिक्त गॅस तयार करतात. यामुळे सूज येणे आणि पोट फुगण्याचाही त्रास होतो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.
कोणते पदार्थ खाल्ल्याने होतो गॅसेसचा त्रास ?
1) पॉपकॉर्न
पॉपकॉर्न हे जगभरातील लोकांचे आवडते टाइमपास फूड आहे, जे गप्पा मारताना किंवा चित्रपट पाहताना खायला आवडते. पण त्यात असलेले हाय फायबरचे प्रमाण काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. जेव्हा शरीर पॉपकॉर्नमधील फायबर तोडते तेव्हा ते गॅस सोडते, ज्यामुळे सूज येते. अशा परिस्थितीत पॉपकॉर्न तयार करताना नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा. तसेच त्यावर थोडी जिरे पावडर किंवा काळी मिरी पावडर भुरभुरवून, खाल्ल्यानेही मदत मिळते. पॉपकॉर्न नीट चावून-चावून खावेत.
2) कच्चं सॅलॅड
सॅलॅड हे हेल्दी फूड आहे, पण कच्च खाल्ल्याने डायजेस्टिव्ह सिस्टीमवर कठीण पर्भाव पडू शकतो. कच्च्या भाज्यांमध्ये सल्फरसारखी कंपाऊंड असतात, ज्यामुळे दुर्गंधीयुक्त गॅस आणि सूज येऊ शकते. त्यामुळे सॅलॅड खाताना भाज्या हलक्या, परतून किंवा वाफवून घ्याव्यात. तसंच पचन सुलभ करण्यासाठी आलं किंवा मिरपूड सॅलॅडमध्ये वापरता येऊ शकते.
3) च्युइंग गम
च्युइंग गम जरी सॉफ्ट वाटत असले तरी त्यामुळे गॅस आणि सूज देखील येऊ शकते. गम चघळताना जास्त हवा गिळली जाऊ शकते. ज्यामुळे गॅसेसचा त्रास होऊ शकतो. यासाठी च्युइंग गम खाण्याची सवय कमी करा. त्याऐवजी मुखवास, बडीशोप खाऊ शकता.
4) कांदा
बऱ्याच पदार्थांत कांदा वापरला जातो, ज्यामुळे चव वाढते. पण त्यामध्ये फ्रुक्टेनही असते, जे काही लोकांसाठी पचण्यास जड असते. ते पोटात तुटल्यावर गॅस तयार होऊ शकतो. तुम्हाला जर कांदा खायला आवडत असेल पण त्यानंतर गॅसेसचा त्रास होत असेल तर तो नीट शिजवून खा. कच्चा खाऊ नये.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)