अति केळी खाणेही धोकादायक, अनेक आजारांचा धोका

| Updated on: Dec 03, 2024 | 3:50 PM

केळी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, त्यांचे जास्त सेवन धोकादायक ठरू शकते. दिवसाला 2-3 पेक्षा जास्त केळी खाणे टाळावे. जास्त केळी खाण्याने वजन वाढ, कोष्ठबद्धता, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे आणि हायपरकॅलेमिया सारख्या समस्या उद्भवू शकतात. मधुमेह आणि किडनीच्या समस्या असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास केळी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

अति केळी खाणेही धोकादायक, अनेक आजारांचा धोका
मधुमेहाच्या रुग्णांनी केळं खाणे योग्य कि अयोग्य ?
Follow us on

केळी खाणं खूप चांगलं असतं. केळी खाल्ल्याने आपली पचनसंस्था चांगली राहते. पोटाचे विकार होण्यापासून बचाव होतात. डॉक्टरही आपल्याला केळी खायला सांगत असतात. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरात पोषणाचा तुटवडा असेल किंवा शरीर कमजोर झाले असेल, तर केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, कोणताही पदार्थ खाल्ला तरी तो योग्य प्रमाणातच खावा लागतो. शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज एक घडा केळी खाल्ल्यास समस्या वाढू शकतात. केळी जास्त खाल्ल्याचे परिणाम काय होऊ शकतात, हे आहारतज्ज्ञांनी सांगितले आहे.

केळी एक अत्यंत लाभदायक फळ आहे. पण दिवसाला 2 ते 3 पेक्षा जास्त केळी खाणे योग्य नाही, असे आहारतज्ज्ञांचं मत आहे. व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6, पोटॅशियम, फायबर केळीत मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. एका केळीमध्ये 65 किलो कॅलरी असतात. त्यात 0.1 ग्रॅम फॅट, 1 ग्रॅम प्रोटीन, 16.2 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 264 मिलिग्रॅम पोटॅशियम आणि 1.1 ग्रॅम फायबर असतो. त्यामुळे दिवसाला 2 ते 3 केळी खाणं पुरेसे आहे. पण ते शरीराच्या स्थितीवरही अवलंबून असते. यापेक्षा जास्त केळी रोज खाल्ल्यास विविध शारीरिक समस्या होऊ शकतात.

प्रमाणाच्या बाहेर केळी खाल्ल्याने काय समस्या होऊ शकतात?

वजन वाढू शकतं

केळ्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे चरबी कमी करण्यात मदत होते. पण जास्त केळी खाल्ल्यास शरीरात फायबरचे प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. केळ्यात शर्कराही मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे जास्त केळी खाल्ल्याने पोट- कंबरेतील चरबी वाढू शकते.

बद्धकोष्ठता समस्या

केळ्यात योग्य प्रमाणात स्टार्च असतो. हे घटक कोष्ठबद्धतेची समस्या वाढवू शकतात. केळ्यात टॅनिक अॅसिड असतो, जो शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास पचनाच्या समस्यांचा कारण ठरू शकतो. आहारतज्ज्ञांचा सल्ला आहे की, कोष्ठबद्धतेच्या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी 2 पेक्षा जास्त केळी रोज खाऊ नयेत.

मधुमेहाच्या रुग्णांनो सावधान

केळ्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ जास्त असतो. त्यात जास्त प्रमाणात शर्करा असल्यामुळे, रोज जास्त केळी खाल्ल्यास रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना रोज केळी खाण्याचा सल्ला दिला जात नाही.

हायपरकॅलेमिया

रोज केळी खाल्ल्यास शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते. याला वैज्ञानिक भाषेत ‘हायपरकॅलेमिया’ म्हणतात. या रोगामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते. किडनीच्या समस्यांसह असलेल्या व्यक्तींनी केळी खाणे टाळावे. त्याशिवाय, आवश्यकता नसताना जास्त पोटॅशियम शरीरात गेल्यास स्नायू आणि मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते.

मायग्रेन

केळ्यात टायरोमाइन नावाचे एक यौगिक असतं, जे शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास मायग्रेनची समस्या निर्माण करू शकते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्यांना केळी खाणे टाळावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)