मुंबई : वसंत पंचमी (Basant Panchami 2021) हा ज्ञान आणि संगीताची देवता असलेल्या माता सरस्वती यांच्या पूजेचा दिवस आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला दरवर्षी वसंत पंचमी साजरी केली जाते. वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीचा प्रकट दिवस म्हणून साजरा केला जातो (Basant Panchami 2021 special does and don’ts on this day).
संगीत क्षेत्राशी संबंधित लोक आणि विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी आईची पूजा केल्याने माता सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात. परंतु, जर तुम्हाला खरोखरच माता सरस्वतीचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर वसंत पंचमीच्या दिवशी ‘ही’ काही काम करण्यास विसरू नका..
– वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे कपडे परिधान केले जातात. कारण हा रंग माता सरस्वतीचा आवडता, तसेच वसंत ऋतूचा रंग म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की, जर या दिवशी आपण पिवळे कपडे घालू शकला नाहीत, तर किमान आपल्या हाताच्या मनगटावर पिवळा रुमाल बांधला पाहिजे. जर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घातले नसतील, तर किमान तरी काळे कपडे तरी परिधान करू नका. एखाद वेळेस पिवळ्या रांगासारखा दिसणारा रंग परिधान करू शकता. परंतु, मनगटावर पिवळा रुमाल बांधण्यास विसरू नका.
– माता सरस्वतीची पूजा केल्यानंतर दिवसभर सात्विक भोजन करावे. आजच्या दिवशी मांस, मद्यपान आणि तामसिक आहार घेऊ नये.
– आजच्या दिवशी कोणाशी भांडण करू नका. कोणाशीही वाईट वागू नका किंवा कोणाचीही फसवणूक करू नका. शांतपणे माता सरस्वतीचे ध्यान करा (Basant Panchami 2021 special does and don’ts on this day).
– सकाळी स्नान आणि पूजा करण्यापूर्वी काहीही खाऊ नका. पूजे होईपर्यंत उपवास ठेवा, त्यानंतर आपण प्रसाद खाऊन व्रत उघडू शकता.
– वसंत पंचमी दिवशी, झाडे किंवा रोपांची कापणी करू नये. यामुळे पितरांना-वाडवडिलांना त्रास होतो.
भरपूर खास आहे यावेळची वसंत पंचमी (Basant Panchami 2021 Shubh Muhurat)
यंदाची वसंत पंचमीच्या भरपूर खास आहे. आजच्या दिवशी अमृत सिद्धि योग आणि रवि योग हे अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. त्याचबरोबर रेवती नक्षत्रातही साजरे केले जाईल. या दोन शुभ योगामुळे वसंत पंचमी दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. पंचमीची तिथी 16 फेब्रुवारी रोजी, पहाटे 03:36 पासून सुरू होईल आणि दुसर्या दिवशी 17 फेब्रुवारी रोजी, पहाटे 5.46 पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच, 16 फेब्रुवारी रोजी आपण दिवसभर कोणतेही शुभ कार्य करू शकता. या दिवसाची सर्वात शुभ वेळ 11:30 ते 12:30 दरम्यान असेल.
(Basant Panchami 2021 special does and don’ts on this day)
Guru Uday 2021 | शुक्राच्या अस्तानंतर ‘गुरु’चा उदय, ‘या’ राशींचे नशीब फळफळणार!#GuruUday | #GuruUday2021 | #astrology | #ZodiacSigns https://t.co/WvXcJuwjTf
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021