प्रत्येकाला स्वतःचे केस लांब आणि जाड तसेच दिसायला निरोगी असावेत असे वाटते. यासाठी अनेक महिला केराटिन करून घेतात आणि आता बोटॉक्स ट्रीटमेंट मोठ्या ट्रेंडमध्ये आहे, पण या उपचारांचा परिणाम काही दिवसांचाच असतो. यानंतर केस आणखीनच खराब दिसू लागतात. या उपचारांमध्ये केसांना अनेक प्रकारची केमिकलयुक्त प्रॉडक्ट लावले जातात, ज्यामुळे कालांतराने केस अधिकच खराब होऊ शकतात. नैसर्गिकरित्या खराब झालेले केस नीट करण्यासाठी आणि केस मऊ करण्यासाठी कोरफड अतिशय प्रभावी आहे. खरं तर यात हायड्रेटिंग गुणधर्म असतात. आठवड्यातून एकदाच कोरफड काही गोष्टींसोबत लावल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.
केस खराब होण्याची अनेक कारणे आहेत, जसे की धूळ आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे केस खूप फ्रिजी होतात. त्यात तुम्हाला हिवाळ्यात ही समस्या सार्वधिक वाढते, कारण अनेकजण हिवाळयात गरम पाण्याने केस धुवू लागतात. अश्यातच तुमचे देखील केस खूप फ्रिजी झाले असतील तर केस मऊ आणि नैसर्गिकरित्या चमकदार होण्यासाठी कोरफडमध्ये कोणत्या गोष्टी मिसळल्या जातात. ते जाणून घेऊयात.
फ्रिजी झालेल्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोरफड जेलमध्ये अंड मिसळू शकता. कोरफड केसांना हायड्रेट आणि मऊ करेल, तर अंडे प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे, म्हणून हे केसांना चमकदार बनवण्यास आणि खराब झालेल्या केसांना चांगले करण्यास मदत करते. दर आठवड्याला अंड आणि कोरफडीचा हेअर मास्क लावल्यास केस नैसर्गिकरित्या चमकदार तर होतीलच, शिवाय केस तुटणे आणि गळणेही कमी होईल.
केस मऊ, चमकदार करण्यापासून ते केसगळती रोखण्यापासून व कोंड्यापासून सुटका मिळवण्यापर्यंत, मेथी आणि कोरफड हेअर मास्क चांगले परिणाम देतात. अंड्यांचा वास आवडत नसेल तर मेथीदाणे भिजवून त्यांची बारीक पूड करून कोरफड जेलमध्ये मिक्स करून केसांना लावा. या दोन्ही गोष्टींचे कॉम्बिनेशन देखील काही दिवसात तुमचे केसांना चांगले परिणाम देतात.
खराब झालेले केस चांगले करण्यासाठी आणि त्यात केसांना मजबूत करण्यासाठी तुम्ही दही आणि कोरफडीचा हेअर मास्क तयार करू शकता. सर्वप्रथम दही नीट फेटून त्यात कोरफड जेल मिसळा. कोंडा असणाऱ्यांसाठी हा हेअर मास्क खूप फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)