मेकअप किटमध्ये ‘हे’ ब्युटी प्रॉडक्ट्स अवश्य ठेवा; सौंदर्यासाठी ही काळजी घेतलीच पाहिजे

| Updated on: Jun 26, 2021 | 11:25 PM

काही मिनिटांत मेकअप उरकण्यासाठी आपणास कित्येक हातांची आवश्यकता असते. तुलनेत लिपस्टिक, डोळ्यांचा मेकअप यांसारख्या गोष्टी थोड्या सोप्या असतात. (Be sure to include 'these' beauty products in the makeup kit; It must be taken care of for beauty)

मेकअप किटमध्ये हे ब्युटी प्रॉडक्ट्स अवश्य ठेवा; सौंदर्यासाठी ही काळजी घेतलीच पाहिजे
मेकअप किटमध्ये 'हे' ब्युटी प्रॉडक्ट्स अवश्य ठेवा
Follow us on

मुंबई : मेकअप करणे हा प्रत्येक मुलीचा छंद असतो. विशेषत: जेव्हा घरात लग्न आणि मेजवानीसारखा कोणताही कार्यक्रम असेल तेव्हा मुली आवर्जून मेकअपला पहिली पसंती देतात. मुळात अधिक सौंदर्यवान दिसणे कुणाला आवडणार नाही. याबाबत हल्ली मुलेही अधिक काळजी घेऊ लागली आहेत, तर मग मुलींची गोष्ट आणखी न्यारी असणारच ना. असो, याच अनुषंगाने आम्ही आपल्याला याठिकाणी आपल्या बॅगमध्ये घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेल्या मेकअपच्या खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत. (Be sure to include ‘these’ beauty products in the makeup kit; It must be taken care of for beauty)

मेकअप करणे तितके सोपे आहे. यामागचे एक कारण म्हणजे मेकअप तयार होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. काही मिनिटांत मेकअप उरकण्यासाठी आपणास कित्येक हातांची आवश्यकता असते. तुलनेत लिपस्टिक, डोळ्यांचा मेकअप यांसारख्या गोष्टी थोड्या सोप्या असतात. मात्र इतर प्रकारचा मेकअप करण्यासाठी आपला मेकअप किट परफेक्ट असायलाच हवा. कुठेही घेऊन जाता येतील, अशी काही 5 सौंदर्य उत्पादने आपल्या मेकअप किटमध्ये आवश्यक असतात.

सनस्क्रीन स्प्रे

सनस्क्रीन स्प्रे फार महत्त्वाचा आहे. आपल्या मेकअप किटमध्ये सनस्क्रीन स्प्रे सोबत ठेवलाच पाहिजे. आपण बाहेर फिरत असतो, त्यावेळी आपल्या त्वचेवर परिणाम करणारे बरेच घटक असतात. अगदी सूर्याच्या किरणांचा होणारा परिणामही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. याच दृष्टीकोनातून आपण सनस्क्रीन स्प्रे जवळ ठेवला पाहिजे.

काजळ

व्यक्तीचे सौंदर्य त्याच्या डोळ्यावर अधिक खुलून दिसते. त्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य कायम राखण्यासाठी रीफिलिबल, स्किप-फ्री, डीप पिग्मेंटेड आय पेन्सिलचा आपल्या डोळ्यांच्या मेकअपसाठी वापर करा. या वापरातून तुम्हाला तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य खुलल्याची जादू पाहायला मिळेल.

मॅट लिपस्टिक

मॅट लिपस्टिक सर्वोत्तम मेकअप साधनांपैकी एक आहे. मॅट फिनिशिंग ओठांना एजी सॉफिस्टिकेशन देते. उत्कृष्ट परिणामांसाठी रंग लावण्यापूर्वी नेहमीच ओठांना प्राइमरने तयार करा.

सेल्फ टॅनिंग मिल्की-लोशन

सेल्फ टॅनिंग लोशन तुमच्या चेहऱ्याला एक उत्कृष्ट चमक देते. हे आपल्या चेहर्‍यावर आणि शरीरावर सम, सोनेरी, नैसर्गिक दिसणारी टॅन तयार करते.

केसांचा लाकडी ब्रश

हेअरब्रश नेहमी आपल्या सोबत ठेवा. कारण तो अनेक प्रकारे वापरात येऊ शकतो. तुम्हाला हे माहित आहे की जेव्हा आपण खूप ताणतणाव असतो, तेव्हा आपल्या केसांवर फणी फिरवल्यामुळे आपल्या डोक्यातील रक्त परिसंचरण अर्थात ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि तणाव कमी होतो. लाकडी पॅडल ब्रश आपल्याला तणावमुक्त ठेवण्यास फार मोठी मदत करतो. (Be sure to include ‘these’ beauty products in the makeup kit; It must be taken care of for beauty)

इतर बातम्या

अमरावतीत कोरोनाचा धोका वाढला, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल, ‘या’ वेळेत राहणार सुरु

मेट्रोच्या डबलडेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक, मोठा घातपात घडवण्याचा डाव? नागपूर पोलिसांची धावपळ