पार्लरमध्ये न जाता घरच्या घरीच करा व्हाइटहेड्सवर उपाय, फक्त…

| Updated on: Dec 01, 2024 | 2:23 PM

तुम्ही जर व्हाइटहेड्सच्या समस्येने त्रस्त असाल आणि त्यापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर तुम्ही येथे सांगितलेल्या घरगुती उपाय करू शकता. त्यांच्या मदतीने त्वचेच्या समस्यांपासून लवकरच सुटका मिळेल.

पार्लरमध्ये न जाता घरच्या घरीच करा व्हाइटहेड्सवर उपाय, फक्त...
व्हाइटहेड्सवर उपाय
Follow us on

वाढते प्रदूषण आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे याचा परिणाम आपल्याला शरीरावर तसेच त्वचेवर देखील होत असतो. आपल्या त्वचेवर पुरळ येणे, त्वचा काळी पडणे अश्या अनेक त्वचेसंबंधित समस्या निर्माण होत असतात. यासाठी अनेकजण आपली त्वचा सुंदर दिसण्याकरिता अनेक घरगुती उपाय करतात. अश्यातच तुमच्या त्वचेवर व्हाईटहेड्स आहे तर ही एक सामान्य समस्या आहे. हे व्हाइटहेड्स नाक आणि हनुवटीवर सर्वात जास्त दिसतात. त्याचबरोबर पौगंडावस्थेतील बदल, हार्मोनल बदल, अनुवांशिकता, ताणतणाव, खराब जीवनशैली किंवा त्वचेची योग्य काळजी न घेणे अशी अनेक कारण आहेत ज्यामुळे व्हाइटहेड्स येत असतात. त्यातून सुटका मिळवण्यासाठी लोक सर्व प्रकारच्या महागड्या प्रॉडक्टचा अवलंब करतात, पण तरीही व्हाइटहेड्स पासून सुटका होत नाही. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही व्हाईटहेड्सपासून सुटका मिळवू शकता.

व्हाइटहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

मध : तुमच्या त्वचेवरील व्हाइटहेड्स व्हाइटहेड्स काढून टाकण्यासाठी तुम्ही मध वापरू शकता. कारण मधात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म व्हाइटहेड्स काढून टाकण्यास मदत करतात. यासाठी मध हलके गरम करून नंतर चेहऱ्यावर व नाक आणि हनुवटीवर असलेले व्हाइटहेडसवर लावावे. १०-१५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमच्या घरात असलेल्या मधाच्या वापराने तुमच्या त्वचेवरील व्हाइटहेड्स निघून जातील आणि तेव्हा मुलायम होईल.

टोमॅटोने मसाज करा : आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा वापर करून त्वचेवरील व्हाइटहेड्स काढू शकतात. कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले घटक तुमच्या त्वचेवरील व्हाइटहेड्सपासून मुक्तता मिळते. यामुळे चेहरा खोलवर स्वच्छ होतो आणि व्हाइटहेड्सची समस्या दूर होते. यासाठी टोमॅटो कापून व्हाईटहेड्सच्या जागी मसाज करावा. त्यानंतर १०-१५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

दही आणि ओट्स : व्हाइटहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दही आणि ओट्सचा वापर करू शकता. यासाठी ३ चमचे दह्यामध्ये १ चमचा पावडर ओट्स मिसळून पेस्ट तयार करावी. आता ही पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावा. त्यानंतर पेस्ट पूर्णपणे सुखल्यावर चेहरा धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

मुलतानी माती : प्रदूषणामुळे अनेकांची त्वचा काळी पडते त्यामुळे अनेक जण त्वचा चमकदार करण्याबरोबरच व्हाइटहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करतात. मुलतानी माती ही त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे मुलतानी माती घेऊन त्यात ४ चमचे गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करावी. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. लवकरच तुम्हाला याचा फरक जाणवेल.