हिवाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेणं अत्यंत कठीण होते. हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये आद्रतेची कमी होते ज्यामुळे तुमची त्वाचा खराब होऊ शकते. हिवाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर चेहरा कोरडा आणि निस्तेज होतो. हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. चेहरा स्वच्छ ठेवल्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहाते. हिवाळ्यात जास्तवेळ चेहरा धुतल्यामुळे देखील त्याच्यावरील नैसर्गिक तेल निघून जाते. चाहरा चमकदार आणि हेल्दी बनवण्यासाठी त्यावर दही आणि मधाचा फेस पॅक वापरा. त्याच्या वापरामुळे तुमची त्वचा निरोगी आणि हेल्दी राहाते. फेस पॅक लावल्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाते.
दही आणि मध तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. दहीमुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात आणि तुमचं आरोग्य निरोगी राहाते. दहीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ आणि कॅल्शियम असते ज्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. त्यासोबतच मध देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. मधामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, खनिजे, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, झिंक, कॉपर अशा घटकांचा समावेश असतो ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाते.
हिवाळ्यात अनेकदा तुमची त्वाचा कोरडी होतो. चमकदार आणि मऊ त्वचेसाठी दही आणि मधाचा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा. दही आणि मध तुमच्या चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमची त्वचा अधिक चमकदार आणि मॉइश्चरायझ होण्यास मदत होते. दही आणि मधाच्या फेस पॅकमुळे तुमची त्वाचा हायड्रेट होते आणि त्यावर नैसर्गिक चमक येते. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ करण्यास आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते.
दही आणि मधाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते. मधामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची त्वचा चमकण्यास मदत होते आणि त्वचेला नुकसान करणारे रॅडिकल्स निघून जातात. दही आणि मधाची पेस्ट तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या दूर करते. दही आणि मधाची पेस्ट तुमच्या चेहऱ्याला तणावमुक्त करतात. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमची त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते.
एका बाऊलमध्ये दही आणि मध एकत्र करा. त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून त्याला चांगलं मिक्स करा. त्यानंतर या सर्व मिश्रणातची एक गुळगुळीत पेस्ट बनवा. तयार पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर तुमचा चेहरा कोमट पाण्यानी स्वच्छ धुवा यामुळे तुमचा चेहरा अधिक चमकदार आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.