Beauty Tips | डोळ्याखालील सर्कल घालवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

| Updated on: Jul 04, 2021 | 8:12 AM

व्हिटॅमिन सी, हयालूरोनिक ऍसिड, रेटिनॉल यांना वाढत्या वयाचे नायक म्हटले जाते. तुम्ही तुमच्या पॅन्ट्रीमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून त्वचेचे सौन्दर्य जपू शकता. (Do this home remedies to get rid of eye circles)

Beauty Tips | डोळ्याखालील सर्कल घालवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
डोळ्याखालील सर्कल घालवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
Follow us on

मुंबई : वय जसे वाढत जाते, तसतसा त्वचेवर वाढत्या वयाच्या खाणाखुणा दिसणे हे स्वाभाविक आहे. पण म्हणून कोणी आपले वाढते वय ठळकपणे दिसून येऊ नये म्हणून प्रयत्न करण्याचे सोडून देत नाही. तुम्ही अजूनही यौवनात आहेत, असे आपल्याबद्दल कुणाच्या तोंडून ऐकायला मिळाले तर प्रत्येक व्यक्तीला आनंद होतो. आज आनंद तुम्हाला कमावण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेची पुरेशी काळजी घ्यायलाच हवी. वाढत्या वयाची सुरुवातीची लक्षणे दिसता कामा नये म्हणून तुम्ही निश्चितच प्रयत्न करू शकता. (Do this home remedies to get rid of eye circles)

व्हिटॅमिन सी, हयालूरोनिक ऍसिड, रेटिनॉल यांना वाढत्या वयाचे नायक म्हटले जाते. तुम्ही तुमच्या पॅन्ट्रीमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून त्वचेचे सौन्दर्य जपू शकता. किंबहुना वय वाढले तरी तुम्ही अधिक सुंदर दिसू शकता. तुम्ही तुमच्या अंडर-आय एरियाला कन्सीलरकडून सील करण्यासाठी आकर्षित करू शकता. तुम्ही डीआयवाय क्रीम बनवून त्वचेच्या आरोग्यातील अडसर दूर करू शकता.

पोटॅटो आय क्रीम

साहित्य
– 2 मोठे चमचे आलोवरा जेल
– 1 मोठा चमचा बटाट्याचा रस
– 1 मोठा चमचा व्हिटॅमिन ई कॅप्सूल

क्रीम बनवण्याची प्रक्रिया

एक बटाटा धुवून त्याची साले काढा. नंतर बटाटा कापून तो ब्लेंडरमध्ये टाका. मात्र त्यात जास्त पाणी टाकू नका. याचे घट्ट मिश्रण बनेपर्यंत अर्थात ठराविक वेळेपर्यंत मिश्रण हलवा आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वीप करा. आपल्या डोळ्याच्या खालील भागाला हे क्रीम लावा व नंतर थोड्या वेळाने चेहरा धुवा. जेल-क्रीम रेफ्रिजरेटमध्ये ठेवा. या क्रीमचा 4 दिवसांपेक्षा जास्त वापर करू नका.

ग्रीन टी क्रीम

साहित्य
– 2 चमचे शिया बटर
– 1/4 छोटा छोटा मोम
– 1 छोटा चमचा बदाम तेल

ग्रीन टी बॅग

प्रक्रिया
एक डबल बॉयलर घ्या. त्यात ग्रीन टी वगळता सर्व सामग्री पाण्यात विरघळवा. एकदा लिक्विड एकजीव झाल्यानंतर ग्रीन बॅग फाडून डबल बॉयलरमध्ये टाका. चहाच्या मिश्रणाचा रंग बदलत नाही, तोपर्यंत लिक्विड मंद गॅसवर ठेवा. नंतर गाळणीने गाळून घेऊन लिक्विड एअरटाईट कंटेनरमध्ये टाका. काही तासांसाठी हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. रात्री क्रीम लावून ती पुन्हा फ्रिजमध्ये ठेवा. (Do this home remedies to get rid of eye circles)

इतर बातम्या 

बँका देतात कुठल्याही गॅरंटीशिवाय कर्ज, जाणून घ्या प्री-अँप्रुव्हड कर्ज नेमके काय आहे?

अ‍ॅमेझॉनचे छोट्या व्यावसायिकांना बळ; ‘स्मॉल बिझिनेस डे’मध्ये तुम्ही व्हा सहभागी