मुंबई : आपण केसाचा भांग पाडताना कंगव्याचा (Comb) वापर करत असतो. कंगव्याचे अनेक प्रकार असले तरी आपण ते खरेदी करताना केवळ रंग व कंगव्याच्या दातांचा विचार करीत असतो. अनेक जणांच्या मते ओले केस विंचरताना ते तुटतात. यामुळे ते ओल्या केसांसाठी कंगव्याचा वापर करणे टाळतात. अशीच परिस्थिती कुरळे केस (Curly hair) असलेल्यांची असते. जास्त कुरळे व दाट केस असलेले लोकदेखील शक्यतो कंगव्याचा वापर करणे टाळत असतात. आधीच कुरळे केस असल्याने त्यात कंगवा अडकतो व परिणामी केस गळतात. कंगवा हे केसगळतीचे एक कारणदेखील सांगितले जात असते. परंतु हा गैरसमज असून केसांच्या प्रकारानुसार कंगवा वापरणे आवश्यक असते. केसांच्या विविध स्टाइल्स करण्यासाठी विविध कंगव्याचा वापर केला जात असतो. परंतु हे केवळ हेअर स्टाइलसाठीच (Hairstyles) नव्हे तर दैनंदिन जीवनातदेखील केसांचा प्रकार ओळखून त्यानुसार कंगवा वापरणे योग्य ठरत असते. कंगवा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे देखील जाणून घेऊ.
डेटेंगलर ब्रश सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य आहे. अगदी जाड, कुरळे केस ओले आणि कोरडे दोन्ही केसांसाठी तुम्ही हा कंगवा वापरू शकता. त्यांचे ब्रिस्टल्स खूप पातळ आणि लवचीक असतात, जेव्हा तुम्ही गुंता झालेल्या केसांना नीट करण्याचा प्रयत्न करता तेव्हा बहुतेक केस तुटतात, परंतु जर तुम्ही त्यांना डेटेंगलर कंगव्याने नीट केल्यास केसांचे कुठलेही नुकसान होत नाही.
या कंगव्याचे बारीक मऊ ब्रिस्टल्स तुमच्या केसांच्या मोठ्या गुंत्यालाही सहजपणे उलगडू शकतात आणि ते इतके मऊ असतात की ते केसांना कोणतेही नुकसान करत नाहीत. अमेरिकन ॲकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनचा असा विश्वास आहे की ओल्या केसांवर कंगवा करू नये कारण ओले केस लवकर तुटतात, परंतु जर तुमचे केस खूप कुरळे असतील तर ते ओले असतानाच विंचरणे गरजेचे आहेत.
या कंगव्याचा केसांसाठी खूप उपयोग होतो. मोठ्या दातांचा कंगवा जास्त गुंता असलेले केस सोडवण्यास चांगला पर्याय ठरतो, शिवाय केस तुटण्याची भीती असणाऱ्यांनी हा कंगवा वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
कुशन कंगव्यामध्ये मऊ रबर बेस आणि प्लास्टिकचे ब्रिस्टल्स असतात. हे ब्रिस्टल्स थोडे कठीण असतात जे टाळूला ‘स्टिम्यूलेट’ करण्यास मदत करतात. जर तुम्हाला कोंडा असेल किंवा तुम्ही हेअरस्टाइलची प्रोडक्ट वापरत असाल तर हा ब्रश टाळूवरील अडकलेली घाण व कोंडा काढण्यास मदत करत असतो.
पॅडल कंगवा सहसा चौरस आकारात येतो. त्याचे ब्रिस्टल्स लवचिक असतात. आणि बॉल टीपने टाळूची मालिश होते, यामुळे केस मोकळे होण्यास मदत होते.
हेअरस्टायलिस्टला गोल ब्रशने केस स्टाइल करताना तुम्ही पाहिले असेल. त्या गोल असलेल्या कंगव्याला थर्मल किंवा बॅरलब्रश म्हणतात. हे बॅरल्स सिरेमिक, टूमलाइन किंवा टायटॅनियम सारख्या सामग्रीपासून बनलेले आहेत. हे ब्रशेस हेअर ड्रायरसह उत्तम प्रकारे वापरले जातात आणि ते जलद कोरडे करण्यासाठी आणि केसांच्या स्टाइलसाठी वापरले जातात.
या कंगव्याला बारीक शेपूट असते आणि कंगव्याचे दात अगदी बारीक असतात. त्यांची मांडणीही इतर कंगव्यांपेक्षा वेगळी असते. त्याचे सर्व दात समान आकाराचे नसतात, एक लहान आणि एक मोठा दात असतो. हे केसांमध्ये बॅक कॉम्बिंगसाठी वापरले जाते.
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी टोनर अत्यंत फायदेशीर, टोनर वापरण्याची पद्धत जाणून घ्या!
Skin care tips : कोथिंबीरमध्ये या गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
Skin care tips : एका रात्रीत पिंपल्सची समस्या दूर करा! औषधांऐवजी घरगुती उपाय फायदेशीर!