हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय, मग ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

| Updated on: Dec 02, 2024 | 4:18 PM

हिवाळ्यात अनेक जण कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात आणि फेसवॉश केल्यावर चेहरा खूप कोरडा दिसतो. त्यामुळे या हिवाळ्यात तुम्ही बाजारातील फेसवॉशच्या जागी काही नैसर्गिक गोष्टी वापरू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम होईल आणि त्वचेला अनेक समस्यांपासून आराम मिळेल.

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय, मग हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Follow us on

हिवाळ्यात कोरड्या वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी पडू लागते आणि काही लोकांना आधीच कोरड्या त्वचेची समस्या असते. अशा परिस्थितीत फेस वॉशने चेहरा धुतल्यानंतर तो खूप कोरडा दिसू लागतो. यावेळी तुम्ही तुमचा चेहरा काही नैसर्गिक गोष्टींनी धुवू शकता. त्याच्या मदतीने चेहऱ्यावरील कोरडेपणाची समस्या टाळता येते. याशिवाय त्वचेच्या इतर समस्या जसे की पिंपल्स, निस्तेज चेहरा, टॅनिन या समस्या देखील दूर होतात. तुमचाही चेहरा फेसवॉशने धुतल्यानंतर कोरडा दिसत असेल तर जाणून घ्या चेहरा स्वच्छ करण्यासाठी इतर कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो.

चेहऱ्याचा कोरडेपणा वाढल्याने त्वचा ताणलेली आणि ओढल्यासारखी वाटू लागते. याशिवाय ओरखडे पडण्याची ही भीती असते. चेहरा एकदम निस्तेज दिसतो त्यामुळे त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आणि कोरडेपणाचा सामना करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीने चेहरा धुऊ शकता ते जाणून घेऊ.

बेसन पीठ, दूध आणि गुलाब पाणी

दुधात क्लिन्झिंग गुणधर्म असतात, बेसन पीठ मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याचं काम करते, तर दूध आणि गुलाब पाणी देखील चेहऱ्यावरील आर्द्रता टिकवून ठेवण्याचा काम करते. दुधात थोडे बेसन पीठ आणि गुलाब पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट पाच मिनिटे चेहऱ्यावर लावून मसाज करा त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

बेसन पीठ आणि दही

बेसन पीठ आणि दही हे चांगला फेसवॉश म्हणून काम करू शकतात. दोन्ही घटकांमध्ये त्वचा साफ करणारे गुणधर्म आहेत तर दही त्वचेला आर्द्रता देखील देईल आणि कोरडेपणा कमी करेल. यासाठी दही आणि बेसन पीठ एकत्र मिक्स करा. तुम्ही त्यामध्ये चिमूटभर हळद देखील घालू शकता पण जास्त हळद टाकू नका. नाही तर त्वचा पिवळी दिसू शकते. हे मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ मसाज करा. दोन मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

कोरफड आणि मुलतानी माती

मुलतानी माती देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. फक्त ती लावल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. कोरफड आणि मुलतानी माती मिक्स करून लावा. मुलतानी माती फेसवॉश म्हणून काम करेल तर कोरफड तुमच्या त्वचेला हायड्रेट करेल आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करेल. अर्धा चमचा मुलतानी माती पावडर मध्ये एक चमचा कोरफड गर टाकून मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि त्वचा स्वच्छ करण्यासाठी गोलाकार पद्धतीने मसाज करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.