लांब आणि सुंदर केस असणे ही प्रत्येक महिलेची इच्छा असते, पण केसांमध्ये जर दुतोंडी केसांची समस्या (स्प्लिट टोक) असतील तर त्यामुळे केसांचे सौंदर्य कमी होतं. जेव्हा तुमच्या केसांचा ओलावा आणि पोषण कमी होते तेव्हा दुतोंडी केसाची समस्या उद्भवतात. याशिवाय वारंवार उष्णतेची स्टायलिंग, रासायनिक उत्पादनांचा अतिवापर किंवा योग्य काळजी न घेणे यामुळेही केस दुतोंडी होतात. अश्याने केस अतिशय निर्जीव आणि कोरडे दिसतात. त्याबरोबर केस गळण्यासारख्या समस्या उद्भवतात.
तुम्हाला सुद्धा दुतोंडी केसांच्या समस्येपासून सुटका मिळवायची असल्यास तुम्ही योग्य सवयी आणि घरगुती उपायांचा अवलंब करून तुमचे केस पुन्हा निरोगी बनवू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला असे सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत जे तुमच्या केसांना दुतोंडी होण्यापासून वाचवतील आणि त्यांना निरोगी बनवतील.
बराच वेळ केस न कापल्याने केसांमध्ये दुतोंडी केसांची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे शक्य असल्यास दर ६-८ आठवड्यांनी केस कापत राहावे. ट्रिमिंगमुळे केसांची दोन तोंडं निघून जातात आणि केसांची वाढ सुधारते. केस कापल्या नंतर केसांची दोन तोंडे तर कमी होतातच शिवाय केस गळण्यासारख्या समस्येपासूनही काहीसा आराम मिळतो.
दुतोंडी केसांची समस्या असल्यास केसांना पोषणाची गरज असते. पोषणाशिवाय केसांचे आरोग्य अतिशय बिघडते आणि मग केसांमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे केसांना वेळोवेळी हेअर मास्क लावावा. तुम्ही घरच्या घरी देखील हेअर मास्क बनवू शकता. हेअर मास्कसाठी अंड्यातील पिवळ बलकात २ चमचे मध आणि २ चमचे खोबरेल तेल मिसळून केसांना ३० मिनिटे लावून ठेवावे. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. हा मास्क केसांना पोषण तर देतोच पण केस मऊ आणि चमकदार बनवतो.
दुतोंडी केस टाळण्यासाठी गरम तेलाने केसांना मसाज करणे देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी नारळ, ऑलिव्ह किंवा बदामाचे तेल हलके गरम कोमट करून टाळू आणि केसांवर हळुवारपणे मसाज करा. केस असेच १ तास ठेवा आणि नंतर शॅम्पू करा. या पद्धतीमुळे केसांचे सखोल पोषण होईल आणि केसांना दोन टोके दुतोंडी केस होण्यापासून रोखले जाईल.
अनेकदा काही लोकं अतिशय चुकीच्या पद्धतीने केस धुतात, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. तसेच केस कोरडे होतात. त्यामुळे केस निरोगी ठेवण्यासाठी ते व्यवस्थित धुणे गरजेचे आहे. शक्य असल्यास तुम्ही नेहमी सौम्य शॅम्पू वापरा. जास्त गरम पाण्याने केस धुवू नका. शॅम्पूनंतर नेहमी कंडिशनरचा वापर करा. असे केल्याने तुम्ही केसांच्या दोन तोंडांची समस्या टाळू शकता.
तुम्ही जर नेहमी केसांना स्ट्रेटनरवापरत असला तर याने तुम्हाला दुतोंडी केसांची समस्या निर्माण होऊ शकते. कारण केसांना हिटचा सतत वापर खूप हानिकारक आहे. स्टायलिंगसाठी अनेक जण ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लरचा वापर करतात, ज्यामुळे केसांमध्ये दोन तोंडांची समस्या उद्भवते. त्यामुळे शक्य तो केसांमध्ये उष्णतेची साधने वापरू नका. तुम्ही कधीही याचा वापर करू इच्छित असल्यास, प्रथम उष्णता संरक्षण सीरम लावा.
योग्य आहारा न घेणे यामुळेही केसांच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात सुधारणा करणंही गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की अंडी, डाळी आणि मांस आणि मासे खावे. यासोबतच आहारात ओमेगा-3 फॅटी ॲसिडसाठी नटस आणि बियाण्यांचा समावेश करा. त्याचबरोबर व्हिटॅमिन ईसाठी हिरव्या पालेभाज्या घाला. या प्रकारच्या डाएटमुळे केस आतून मजबूत होतात. व केसांना योग्य पोषण मिळाल्याने केसांची योग्य वाढ होत राहते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)