Whiteheads Removal Mask : व्हाइटहेड्सच्या समस्येमुळे हैराण असाल, तर हे घरगुती उपाय जरूर करा !

| Updated on: Jul 11, 2022 | 3:15 PM

चेहेऱ्यावरील व्हाइटहेड्स अनेकांना त्रास देतात. घरातील दैनंदिन वापरातील काही साध्या सोप्या गोष्टींचा उपयोग करून व्हाइटहेड्सची ही समस्या लगेच दूर करता येऊ शकते.

Whiteheads Removal Mask : व्हाइटहेड्सच्या समस्येमुळे हैराण असाल, तर हे घरगुती उपाय जरूर करा !
व्हाइटहेड्सच्या समस्येमुळे हैराण असाल, तर हे घरगुती उपाय जरूर करा !
Image Credit source: tv9
Follow us on

अनेक लोकांना चेहेऱ्यावरील व्हाइटहेड्सचा (Whiteheads)त्रास असतो. धूळ, प्रदूषण यामुळे त्वचा खराब होतेच, त्यासोबतच व्हाइटहेड्सही वाढतात. त्वचेवरील अतिरिक्त तेल (oil) आणि मृत पेशींमुळे त्वचेच्या छिद्रांपर्यंत हवा पोहोचत नाही. व त्यामुळेच व्हाइटहेड्सही वाढतात. त्यासाठी दरवेळेस पार्लरमध्ये जाणे शक्य नसते, काही जणांकडे तेवढा वेळही नसतो. त्यामुळे अनेक जण घरच्या घरी व्हाइटहेड्स काढण्याचा प्रयत्न करतात. घरात उपलब्ध असलेल्या दैनंदिन वापरातील अनेक गोष्टी वापरून (home remedies) व्हाइटहेड्स काढता येतात. कोरफड, मध, हळदीचा लेप, ओट्स स्क्रव असे अनेक पदार्थ आपण वापरू शकतो. व्हाइटहेड्स रिमूव्हल मास्क (Whiteheads Removal Mask) कसा तयार करायचा, हे आपण पाहूया.

कोरफडीचा रस ( ॲलोव्हेरा जेल)

कोरफडीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. ती फक्त केसांसाठी नव्हे तर शरीरासाठीही खूप उपयुक्त आहे. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफडीचा रस (ॲलोव्हेरा जेल) वापरले जाते. कोरफडीच्या रसामुळे चेहऱ्यावरील अधिकचे तेल निघून जाण्यास मदत होते. व्हाइटहेड्सची समस्या दूर करण्यासाठी एका वाटीत एक चमचा ॲलोव्हेरा जेल घ्यावे. त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण एकत्र करून चेहेऱ्यावर 10 मिनिटे लावून ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाकावा. या मिश्रणामुळे व्हाइटहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

मध

मध हा फक्त खाण्यासाठीच उपयोगी नाही. तर त्याचे खूप औषधी गुणधर्मही आहेत. मधामुळे केवळ व्हाइटहेड्सची समस्या दूर होत नाही तर त्यामुळे त्वचा मऊसूत आणि चमकदारही होते. यासाठी मध थोडासा गरम करावा. त्यानंतर तो व्हाइटहेड्स झालेल्या जागी थोडा वेळ लावून ठेवावा. 20 मिनिटांनी कोमट पाण्याने हे मिश्रण धुवून टाकावे आणि मऊ फडक्याने चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा. यामुळे तुमचे व्हाइटहेड्स निघून जातीलच पण तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल.

ओट्स स्क्रब

सामान्यत: लोक त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी बरेच स्क्रब वा इतर गोष्टी वापरतात. पण घरात उपलब्ध असलेले ओट्सही त्वचा एक्सफोलिएट करू शकतात. व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी ओट्स स्क्रबचा वापर करता येऊ शकतो. एका बाऊलमध्ये 2 चमचे ओट्स, अर्धा चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळा. हे सर्व मिश्रण चांगल्या रितीने एकत्र करा. आता हा स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिटे स्क्रबिंग करत रहा. थोड्या वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. काही दिवस हा स्क्रब वापरल्याने अपेक्षित परिणाम दिसून येईल व व्हाइटहेड्सची समस्या दूर होईल.

हळदीचा लेप

हळद ही अतिशय औषधी असून तिचे अनेक उपयोग आहेत. केवळ खाण्यातच नव्हे तर काही लागल्यास, खरचटून रक्त आल्यास औषध म्हणून सर्वप्रथम हळद लावली जाते. याच हळदीचा त्वचेवर लावण्यासाठीही वापर केला जातो. व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी हळदीच लेप उपयुक्त ठरू शकतो. एका वाटीत अर्धा चमचा हळद घेऊन त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण नीट एकत्र करून व्हाइटहेड्स झालेल्या जागी नीट लावा. 15 मिनिटांनी हा लेप स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हा लेप नियमितपणे वापरल्यास व्हाइटहेड्सची समस्या दूर होईल.