बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींचा (bad lifestyle and unhealthy food habits) आपल्या आरोग्यावर तसेच केसांवरही परिणाम होतो. केस गळणे, तुटणे, त्यांची मुळं कमजोर होणे, केस दुभंगणे, पांढरे होणे, अशा अनेक समस्यांचा (hair problems) सामना आजकाल बऱ्याच जणांना करावा लागतो. धूळ, माती, प्रदूषण यामुळेही केसांचे आरोग्य बिघडते. चांगले केस हवे असतील तर त्यांची योग्य काळजी घेणे, नियमितपणे निगा राखणेही (hair care is important) महत्वपूर्ण असते. चांगला शांपू आणि कंडीशनरचा वापर करणे तर गरजेचे असतेच पण केसांना पोषण मिळणेही महत्वाचे असते. त्यासाठी केसांना नियमितपणे तेल लावावे, त्यांची काळजी घ्यावी. अन्यथा केस गळणे, निर्जीव दिसणे, कोंडा होणे, असा त्रास सहन करावा लागतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने केसांची निगा राखता येते. केस धुताना शांपू व कंडीशनर वापरल्यानंतर होममेड हेअर रिन्स चा (homemade hair rinse) वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होते. कोणकोणते होममेड रिन्स आपण वापरू शकतो, ते जाणून घेऊया..
हे रिन्स तयार करण्यासाठी एक भांडे घेऊन त्यामध्ये दोन कप पाणी घालावे. त्यानंतर त्या पाण्यात एक चमचा ॲपल व्हिनेगर घालून ते नीट एकत्र करावे. शांपूने केस धुवून झाल्यानंतर घरी तयार केलेले हे ॲपल व्हिनेगर रिन्स केसांवर ओतावे व २ मिनिटांन केस पाण्याने पुन्हा धुवावे. यामुळे केसांमधील पीएच लेव्हल कायम राखण्यास मदत मिळते. तसेच केसांची चमकही वाढते.
एका भांड्यात 2 कप पाणी घेऊन त्यामध्ये ब्लॅक टी बॅग्ज घालून ठेवावे, दोन तासानंतर ब्लॅक टीचा अर्क त्यामध्ये उतरला असेल. शांपून केस धुवून झाल्यावर हे पाणी केसांवर ओतावे व थोड्यावेळाने धुवून टाकावे. ब्लॅक टी मध्ये कॅपेन असते, ज्यामुळे केसांचा नैसर्गिक काळा रंग कायम राहतो व ते चमकदारही बनतात. हे ब्लॅक टी रिन्स तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
ॲलोव्हेरा म्हणजेच कोरफड ही केसांसाठी उत्तम मानली जाते. त्याचे अनेक फायदे आहेत. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही कोरफडीचा वापर केला जातो. जर तुम्हाला निरोगी, मजबूत केस हवे असतील तर नियमितपणे कोरफडीचा वापर करावा. ॲलोव्हेरा रिन्स तयार करण्यासाठी थोड्या पाण्यात कोरफडीचा रस म्हणजेच ॲलोव्हेरा जेल नीट मिक्स करावे. केस धुतल्यानंतर हे मिश्रण केसांवर लावून चोळावे व थोडा वेळ तसेच राहू द्यावे. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. ॲलोव्हेरा रिन्समुळे केसांचे पोषण होते व ते चमकदार बनतात.
केस निरोगी व मजबूत बनवण्यासाठी तुम्ही लेमन रिन्सचा वापर करू शकता. त्यासाठी एका भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यांमध्ये लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण नीट ढवळून केस धुतल्यावर त्यावर लावावे. या मिश्रणाचा वापर तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा करू शकता. यामुळे केसांची वेगाने वाढ होते, तसेच केसांचे फ्रीझीनेस पासूनही रक्षण होते.
एका भांड्यात पाणी घेून त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालावा. हे मिश्रण नीट ढवळावे. शांपूने केस स्वच्छ धुतल्यानंतर घरी तयार केलेले हे बेकिंग सोडा रिन्स केसांवर लावावे व केसांना थोडा वेळ मसाज करावा. त्यानंतर केस गार पाण्याने स्वच्छ धुवावेत. यामुळे तेलकट केसांची समस्या कमी होते व केस चमकदार होतात.