हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ 4 घरगुती फेस मास्क करतील मदत

| Updated on: Dec 31, 2024 | 5:50 PM

हिवाळ्यात कोरडी आणि निस्तेज त्वचा आपल्याला खूप त्रास देते. मात्र स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला त्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. या गोष्टी कोरड्या आणि निस्तेज त्वचेपासून सुटका होण्यास मदत करतातच, शिवाय खूप फायदेशीर देखील आहेत.

हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी हे 4 घरगुती फेस मास्क करतील मदत
Face Masks
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेचा कोरडी होणे ही एक सामान्य समस्या आहे, जी प्रत्येक व्यक्तीला थंडीच्या दिवसात होत असते. अशावेळी त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोकं अनेक प्रकारच्या क्रीमचा वापर करतात, पण त्यामुळे त्वचेवर या महागड्या क्रीमचा फारसा फरक पडत नाही. यामुळे वेळ तर वाया जातोच, शिवाय तुमच्या त्वचेला अपेक्षित परिणामही मिळत नाहीत. जर तुम्हालाही हिवाळ्यात कोरड्या आणि निस्तेज त्वचेची समस्या असेल तर तुम्ही घरीच स्वत:साठी फेस मास्क बनवू शकता. ज्याने तुमची त्वचा मुलायम होईल.

हे घरगुती फेस मास्क तुम्हाला कोरड्या आणि निस्तेज त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करतीलच, परंतु तुमच्या त्वचेला खोल हायड्रेशन आणि पोषण देखील मिळेल. हे मास्क हायलूरोनिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी सह मध, एवोकॅडो आणि दही सारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केले जातात. चला तर मग या लेखात जाणून घेऊया हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये तुमच्या त्वचेसाठी सर्वोत्तम असलेल्या 4 फेस मास्कबद्दल.

मध आणि एवोकॅडो मास्क

अर्धा एवोकॅडो घेऊन मॅश करून घ्या. त्यानंतर त्यात दोन चमचे मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर १५ ते २० मिनिटे थांबा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर तुमच्या आवडत्या मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक तुम्हाला कोरड्या आणि निस्तेज त्वचेपासून मुक्तता मिळेल.

ओट्स आणि दही मास्क

दोन चमचे साध्या दहीमध्ये एक चमचा बारीक पूड केली ओट्स मिसळा. चेहऱ्यावर समप्रमाणात लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर करा.

केळी आणि ऑलिव्ह ऑईल मास्क

एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या आणि अर्धी पिकलेली केळी मॅश करा. दोन्ही मिश्रण चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि १०-२० मिनिटे ठेवा. कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

काकडी आणि कोरफड

अर्धा किसलेल्या काकडीमध्ये दोन चमचे ताजे किंवा स्टोअरमधून विकत घेतलेले कोरफड जेल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर चांगले लावा आणि १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.

थंडीच्या दिवसांमध्ये हे फेस मास्कचा वापर केल्यास त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे तर होतीलच, पण हे होममेड फेस मास्क अतिशय किफायतशीर आहेत, जेणेकरून तुम्हाला जास्त खर्च करण्याचा विचारही करावा लागणार नाही. तसेच बहुतांश ॲक्सेसरीज घरी उपलब्ध असल्याने त्याद्वारे केव्हाही तुम्ही स्वत:साठी फेस मास्क बनवू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)