पुणे : कोरोनाचा ताण निवळण्यासाठी लोक आता नवनवीन उपाय शोधत आहेत. वीकेंड जवळ आला की, फिरस्तीची ठिकाणे शोधली जात आहेत. आतासा हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. या मोसमात वॉटर पार्कला पर्यटकांची अधिक पसंती मिळत आहे. जर, तुम्ही जास्त वेळ नसल्याने फक्त एका दिवसातच फिरण्याचा प्लॅन बनवत असाल, तर पुण्यातील ‘या’ वॉटर पार्कला नक्की भेटी देऊ शकता (Best Water parks near pune).
अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका हे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे वॉटर पार्क आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका मुंबई आणि पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. या वॉटर पार्कमध्ये 14 राईडस असून, इथे लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच वेगवेगळया राईड्सचा आनंद लुटू शकतात. खालापूर टोल नाक्यापासून इमॅजिका वॉटर पार्क चार किलोमीटर अंतरावर आहे. अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका वॉटरपार्कची वेळ, शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही इमॅजिका वॉटरपार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता. तर वॉटर पार्कच्या स्थळीही सर्व प्रकारची माहिती मिळू शकते.
एक दिवसाच्या सुटीसाठी, तर पुणेकरांसाठी सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क उत्तम पर्याय आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रावेतपासून एक किलोमीटर अंतरावर असलेले हे एक उत्तम वॉटर पार्क आहे. या ठिकाणी वेगवेगळया वॉटर स्लाईड्स, स्विमिंग पूल आणि वेव्ह पूल असून, अबालवृद्ध इथे पाण्यात खेळण्याचा आनंद लुटू शकतात. पर्यटकांना इथे राहण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे (Best Water parks near pune).
पुण्यातील सिंहगड किल्ल्याजवळच्या डोणजे गावाजवळ असलेले कृष्णाई वॉटर पार्क पंधरा एकरमध्ये पसरलेले असून, या वॉटर पार्कमध्ये तुम्ही वेगवेगळया राईड्सचा आनंद लुटू शकता.
अन्य वॉटरपार्कपेक्षा हा थोडया वेगळया पद्धतीचा पार्क म्हणेज पानशेत वॉटर पार्क. हा पार्क खडकवासला धरणाच्याजवळ आहे. इथे तशा राईड्स कमी आहेत. पण स्पीड बोटिंग, वॉटर स्कूटर्स अशा वॉटर स्पोटर्सचा पर्याय आहे. याच गोष्टींमुळे हा वॉटर पार्क वेगळा ठरतो.
पुण्याच्या लोहगाव परिसरात डायमंड वॉटर पार्क असून इथे तुम्ही वेगवेगळया 28 राईड्सचा आनंद लुटू शकता. वेव्ह पूल, रेन डान्स, फॅमिली पूल, लेझी रिव्हर आणि हनी बनी असे मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या वॉटर पार्कमध्ये मिळतील. इथे पर्यटकांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य असून, पूर्णवेळ जीवरक्षक तैनात असतात. डायमंड वॉटर पार्कची वेळ, शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही डायमंड वॉटर पार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता.
(Best Water parks near pune)
Special Story | निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’, एकदा तरी सफर केलीच पाहिजे!#SandhanValley | #trekking | #travel | #Maharashtra https://t.co/ThhhivLpaE
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2021