Travel | स्वस्तही आणि मस्तही! चेन्नईमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

| Updated on: Feb 16, 2021 | 5:09 PM

आपण आपल्या बजेटमध्ये बसणारे चांगले ठिकाण शोधात असाल, तर चेन्नईला जाण्याची योजना बनवू शकता.

Travel | स्वस्तही आणि मस्तही! चेन्नईमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!
चेन्नई
Follow us on

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान, लोक घरात बसून कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत यावर्षी सगळेच कुठेतरी जाण्याचा विचार करत आहेत. यापूर्वी आपण कमी बजेटमध्ये भेट देता येणाऱ्या बर्‍याच ठिकाणांबद्दल माहिती घेतली आहे. आजही आपण या माध्यमातून अशाच काही जागांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या फिरण्यासाठी चांगल्या आहेत. यावेळी आपण आपल्या बजेटमध्ये बसणारे चांगले ठिकाण शोधात असाल, तर चेन्नईला जाण्याची योजना बनवू शकता. अगदी स्वस्तात फिरता येण्यासारखी अनेक ठिकाणं येथे आहेत (Budget friendly Chennai famous tour destinations).

चेन्नईमध्ये कोणती ठिकाणं पाहाल?

चेन्नईत आपण मरीन बीचवर जाऊ शकता, जे एक अतिशय सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या किनाऱ्यावर आपल्याला बरीच गर्दी दिसेल. हा समुद्र किनारा सुमारे 13 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. जो देशातील सर्वात लांब नैसर्गिक शहरी समुद्रकिनारा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बर्‍याच जागांना येथे भेट देऊ शकता. आर्गेनर अण्णा झू पार्क, विवेकानंद हाऊस, सेंटोम कॅथेड्रल बॅसिलिका, साई बाबा मंदिर, कपालेश्वर मंदिर देखील पाहू शकता.

भेट देण्याची उत्तम वेळ कोणती?

भौगोलिक परिस्थितीमुळे हे शहर खूप उष्ण आहे. म्हणून, जून-जुलै हंगामात येथे जाणे शक्यतो टाळावे. हिवाळ्याच्या काळात किंवा मान्सूनपूर्व काळात चेन्नई फिरणे उत्तम! म्हणून, ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यानचा काळ येथे फिरण्यासाठी अगदी योग्य आहे.

काय काय चाखाल?

चायनीज आणि उत्तर भारतीय खाद्यप्रकारांप्रमाणेच दक्षिण भारतीय पदार्थही खूप लोकप्रिय आहे. दक्षिण भारतीय पदार्थातील सांबार, डोसा आणि इडली व्यतिरिक्त अप्पम, वडा, उपमा, सांबर, परोटा, चेट्टीनाड चिकन, काळी  मिरी चिकन, चिकन स्टू, गोड पोंगल, केसरी, पायसम आणि इतर पदार्थांची चव एकदा तरी चाखलीच पाहिजे (Budget friendly Chennai famous tour destinations).

कसे पोहोचाल?

या शहरांत आपण आपले वाहन घेऊन जाऊ शकता. हे आपल्यावर अवलंबून आहे की, आपल्याला बस, ट्रेन आणि फ्लाईटने जायचे आहे. परंतु आपण कोणत्याही शहरातून म्हणजेच मुंबई, दिल्ली, बेंगलुरू, हैदराबाद आणि कोलकाता येथून चेन्नईला जात असल्यास, उतरण्यासाठी चेन्नई सेंट्रल आणि चेन्नई एग्मोर हे शहरातील मुख्य रेल्वे स्थानके आहेत.

जर, तुम्हाला दिल्लीहून जायचे असेल तर चेन्नई गरीब रथ एक्स्प्रेस आणि चेन्नई राजधानी एक्स्प्रेस सारख्या ट्रेनने प्रवास करू शकता. दिल्लीहून येथे जाण्यासाठी किमान 28 ते 29 तासांचा कालावधी लागेल. दिल्लीहून चेन्नईपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 800 ते 2800 रुपयांपर्यंतची ट्रेनची तिकिटे मिळतील.

राहण्याची व्यवस्था?

जर, तुम्ही मुक्काम करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला येथे अनेक चांगली हॉटेल्स मिळतील. ज्यासाठी तुम्हाला 2800 रुपयांपासून 5500रुपयांपार्यंत भाडे मोजावे लागेल. ज्यामध्ये नाश्त्याची सोय देखील असेल. आपण आरामात येथे राहून, आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.

(Budget friendly Chennai famous tour destinations)

हेही वाचा :