आपण पाहतोच की आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती हा केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती जीवनशैलीमुळे, ही समस्या तरुणांमध्येही येऊ लागली आहे. खरं तर, केसांचे स्वतःचे चक्र असते. दररोज दोन ते चार केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. पण जर 100 पेक्षा जास्त केस गळत असतील तर ते खरोखरच चिंतेचे कारण आहे. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघर सांगतात की, बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की केस गळती ही बायोटिन किंवा व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होते. परंतु हाडे आणि दातांसाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे देखील केस गळू शकतात. त्यामुळे कॅल्शियम कमतरता लक्षात घेता तुम्ही योग्य आहार घेऊन कॅल्शियम पातळी संतुलित राखा.
केस आणि कॅल्शियममधील संबंध
यावेळी तज्ज्ञांचे म्हणण्यानूसार योग्य आहार घेतल्यानंतर शरीराला मिळणारे कॅल्शियम हे आपल्या केसांच्या पेशींना सुद्धा पोषण प्रदान करते. जेव्हा शरीरात कॅल्शियम कमतरता भासू लागली की केसांची मुळे कमकुवत होतात. कॅल्शियम शरीरात कोलेजन तयार करते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोलेजनच्या कमतरतेमुळे टाळूची त्वचा कोरडी होते. त्यांने केस गळण्याची समस्या निर्माण होते.
हेअर फॉलिकल्स आवश्यक
केसांच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या पोषक घटकांपैकी कॅल्शियम हे एक आहे. जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा केसांच्या फॉलिकल्सवर परिणाम होतो. यामुळे केसांची वाढ मंदावते आणि केस गळू लागतात.
कॅल्शियमयुक्त पदार्थ खा.
तज्ञ म्हणतात की प्रौढांना दररोज 700 मिलीग्रॉम कॅल्शियमची आवश्यकता असते. मात्र शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर आरोग्य तज्ञ ही कमतरता भरून काढण्यासाठी सप्लीमेंट्स देऊ शकतात. कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी काय खावे हे तज्ज्ञांकडुन जाणून घेऊया-
दुग्धजन्य पदार्थ – शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी, तुमच्या आहारात दूध, दही, चीज आणि ताक यांसारखे दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करा.
हिरव्या भाज्या – हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम सर्वाधिक प्रमाणात आढळते. तुमच्या आहारात पालक, मेथी सारख्या हिरव्या भाज्या नक्की खा. यामुळे कॅल्शियमची कमतरताही होणार नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)