चेहऱ्यावर बदामाचे तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे उत्तर

| Updated on: Mar 21, 2025 | 12:11 AM

बदाम तेलात व्हिटॅमिन ई आणि अनेक आवश्यक खनिजे तसेच अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत करते. पण ते चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते का? चला तर मग याचं उत्तर जाणून घेऊया.

चेहऱ्यावर बदामाचे तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे उत्तर
almond oil
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us on

बदलते वातावरण आणि जीवनशैली यांचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत असतो. त्यातच आपण जर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर मुरूम आणि अकाली सुरकुत्या येण्याची समस्या उद्भवू शकते. हे टाळण्यासाठी लोकं अनेक प्रकारची बाजारात उपलब्ध असणारी प्रॉडक्टचा किंवा घरगुती उपचारांचा अवलंब करतात . याचवेळी काही लोकांचा असा विश्वास आहे की बदाम तेलाचा वापर त्वचेवर केल्याने अकाली उद्भवणाऱ्या सुरकुत्या कमी करता येतात. यामुळे तुमची त्वचा मऊ देखील होते.

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की, बदामाचे तेल आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. बरेच लोकं ते दुधात मिक्स करून पितात. पण बदामाचे तेल त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचा खूप मऊ होते. तर अशा तऱ्हेने तुमच्या त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यासाठी बदाम तेल कसे फायदेशीर आहे हे की नाही हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

बदाम तेलाचे गुणधर्म

व्हिटॅमिन ई: बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे एक प्रभावी अँटिऑक्सिडेंट आहे. बदाम तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच या तेलाच्या वापराने सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.

फॅटी अ‍ॅसिडस् : बदाम तेलात ओमेगा-3 आणि ओमेगा-9 फॅटी अ‍ॅसिड असतात, जे त्वचेला खोलवर ओलावा देतात. त्वचा कोरडी झाली की सुरकुत्या येऊ लागतात. तेव्हा बदाम तेलाचा वापर चेहऱ्यावर केल्यास यामध्ये असलेले फॅटी अ‍ॅसिड त्वचेला हायड्रेट ठेवतात. ज्याने सुरकुत्यांचा समस्या दूर होतात.

दाहक-विरोधी गुणधर्म : बदाम तेलात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करू शकतात.

बदाम तेल खरोखरच सुरकुत्या कमी करते का?

मेडिकल न्यूज टुडेच्या मते , बदाम तेलात असलेले गुणधर्मामुळे याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील अकाली वृद्धत्वविरोधी चिन्हे कमी होऊ शकतात. अशातच तुम्ही त्वचेच्या काळजीसाठी जर बदाम तेल मॉइश्चरायझर म्हणून वापरले तर ते सुरकुत्या कमी करू शकते. यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते.

कसे वापरायचे

बदाम तेल लावण्यापूर्वी, चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि साफ करा. यानंतर चेहऱ्यावर तेलाचे काही थेंब लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. चेहऱ्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही बदाम तेल रात्री लावून झोपू शकता.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)