मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. सध्या सर्वजण जानेवारी महिन्यातील थंडाव्याची मजा घेत आहेत (Cashew Benefits And Disadvantages). या मोसमात अनेक मोसमी फळांचा आस्वाद घेता येतो. तसेच, मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रुट्सचंही सेवन केलं जातं. ड्राय फ्रुट्सचं नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. त्यातही काजू म्हटलं तर ते सर्वांच्याच आवडीचं असतं (Cashew Benefits And Disadvantages).
आपल्या शरीराला पोषण मिळण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते आणि काजू हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. काजूमुळे शरीराला उब मिळते. त्यासोबतच काजूचे इतरही अनेक फायदे शरीराला होतात. यामध्ये अनेक प्रकारची प्रथिनं आणि मिनरल्स असतात. हे शरीरासाठी महत्त्वाचे आणि फायद्याचे घटक आहेत.
पण काजूचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटेही आहेत. कुठल्याही गोष्टीचं अतिसेवन हे अपायकारक ठरु शकतं.
काजू हे हाय कॅलरी फुड आहे. त्यामुळे याचं सेवन नियंत्रित प्रमाणात करणे आवश्यक असते. 30 ग्राम काजूमध्ये जवळपास 163 कॅलरीज आणि 13.1 फॅट असते. त्यामुळे जर तुम्ही याचं नियमित अतिसेवन करत असाल तर यामुळे तुमचं वजन वाढू शकतं (Cashew Benefits And Disadvantages).
जर कुठल्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्या व्यक्तीने चुकूनही काजूचं सेवन करु नये. काजूबमध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम असतं. त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर आणखी वाढू शकतं. हे त्या व्यक्तीसाठी मोठं धोकादायक ठरु शकतं.
एका नियंत्रित प्रमाणात कॅलरीचं सेवन करणे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही काहीही खाण्याआधी त्यात किती कॅलरीज आहेत, त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार करायला हवा.
सावधान! रक्तदाब-जळजळ-उष्णता, काढ्याच्या अति सेवनाने होतील आरोग्यावर दुष्परिणाम!https://t.co/7oRBN159YB#CoronaPandemic #AyurvedicKadha
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
Cashew Benefits And Disadvantages
संबंधित बातम्या :
Giloy | कर्करोगापासून मधुमेहापर्यंतच्या समस्यांवर गुणकारी ‘गिलॉय’चे सेवन आरोग्यासाठी लाभदायी!
Apple Cider Vinegar | सफरचंदाचे व्हिनेगर पिणे आरोग्यवर्धक? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…
हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…