आचार्य चाणक्य यांना अर्थशास्रज्ञ आणि राजकीय मुत्सदी आणि परराष्ट्रनितीसाठी देखील ओळखले जाते. त्यांचे कौटिल्याचे अर्थशास्र हे प्रसिद्ध आहेच. शिवाय त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात देखील कसे राहावे याचे मंत्र सांगितले आहेत. यामुळे व्यक्ती सुखी आणि समृद्ध तसेच प्रतिष्ठीत जीवन जगू शकतो असे आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे.
आचार्य चाणक्य यांची वाणी चाणक्य निती म्हणून गाजली आहे. त्यांनी समाजाला केलेला उपदेश सर्वांनाच उद् बोधक आहे. तर पाहूयात चाणक्य नितीप्रमाणे समाजात वावरताना काय करावे. चाणक्यने प्रत्येक क्षेत्रातील जनमाणसाची काळजी घेतली आहे. चाणक्य निती वापरुन आपण जीवनात प्रगती करु शकता. सुखी आणि समाधानी जीवनासाठी चाणक्य निती गरजेची आहे. आपण सर्व एकाच सामाजिक परिवेषात राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे गरजेचे आहे की घर आणि परिवारासोबतच समाजात देखील आपला मान सन्मान राहील हे पाहीले पाहीजे.
घर आणि कुटुंब किंवा पत्नी संबधीत बाबी – पुरुषांनी आपल्या घरातील आणि कुटुंबातील वाद – विवाद, घरातील कोणत्याही गोष्टीची बाहेर वाच्छता करणे चुकीचे आहे. जर आपल्या पत्नीबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल नाराज होऊन तिच्या चरित्र, व्यवहार आणि सवयींबाबत कोणालाही सांगू नका. या गोष्टी सांगितल्याने त्यावेळी जरी काही झाले नाही तरी नंतर त्याचे नुकसान भोगायला लागू शकते हे लक्षात ठेवा.
जर आपला कोणत्याही कारणांनी यापूर्वी जर अपमान झाला असेल तर मस्करीतही कोणालाही ते सांगू नका. सर्वसाधारणपणे मस्ती मजाकमध्ये आपण या गोष्टी जवळच्या व्यक्तींना किंवा मित्रांना सांगतो. परंतू अपमान झाल्याच्या बाबी जितक्या गुप्त ठेवता येतील तेवढ्या ठेवाव्यात. जरी आपला अपमान झाला असेल तर तो स्वत: जवळच ठेवावा. अपमानाचे घोट स्वत:च गुपचुप गिळावेत जगजाहीर करु नयेत..
धनसंपती कोणाला नको असते. प्रत्येकाला श्रीमंत आणि समर्थ बनायचे असते. आजच्या काळात पैसा सर्वात मोठी ताकद आहे. परंतू आपल्या आर्थिक स्थितीबाबत कोणालाही काही सांगू नये. असे केल्याने समाजात आपला सन्मान कमी होतो. आणि जेव्हा दुसऱ्याला कळते की आपल्याजवळ पैसा नाही तेव्हा ते आपल्याला टाळायला लागतात. त्यांना वाटते की हा आपल्याकडे पैसे मागायला आला आहे.