‘एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर’ हा शब्द आजकाल बऱ्याचदा कानावर पडतो, बऱ्याच काळापासून हे चालत आलं आहे. पण आजकाल ही प्रकरणं जरा जास्तच कानावर पडतात. वैवाहिक जीवनात पती-पत्नीच्या नात्यामध्य कधी भांडणं होता, तणाव निर्माण होतो. मात्र काही वेळेस पती त्याच्या पत्नीला सोडून दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होतो. त्यामुळे फक्त त्यांचं वैवाहिक आयुष्यचं संकटात सापडत नाही तर त्यामुळे पत्नीवरही मोठा आघात होतो. यामागचे कारण जाणून घेणे अवघड आहे कारण त्याचे कोणतेही अचूक उत्तर नाही, परंतु खरे कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आचार्य चाणक्यांनी दिलेल्या धोरणांची मदत घेऊ शकतो. तथापि, आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये काही प्रमुख कारणे सांगितली आहेत ज्यामुळे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते.
कमी वयात लग्न
अनेक वेळा नात्यांमध्ये अंतर येण्याचे कारण म्हणजे लहान वयात केलेले लग्न. कमी वयात विवाह हे पुरुषांच्या वैवाहिक जीवनात समाधानी नसण्याचे एक कारण असू शकते. जेव्हा खूप लवकर लग्न होते, तेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक परिपक्वता नसते आणि करिअर आणि इतर जबाबदाऱ्यांचे ओझे देखील असते. ज्यामुळे त्यांना त्यांचे लग्न पूर्णपणे समजून घेण्यास आणि त्याची जबाबदारी सांभाळण्यास वेळ मिळत नाही. जेव्हा या जबाबदाऱ्या संपतात तेव्हा ते त्यांच्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करतात आणि या काळात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची शक्यता वाढते.
नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पती-पत्नीमधील अंतर किंवा दुरावा. जेव्हा एक जोडीदार दुसऱ्याची चांगली काळजी घेत नाही, त्याचा आदर करत नाही, त्याच्या इच्छेला महत्त्व देत नाही, तेव्हा हळूहळू नात्यात अंतर वाढू लागतं, शारीरिक आणि भावनात्मक असंतोष निर्माण होतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचं मन आपोआपच नवीन जोडीदार शोधू लागते आणि मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता वाढते.
मुलांच्या जन्मानंतर
अनेक वेळा मुलांचा जन्म झाल्यानंतरही पुरुषांचे इतर स्त्रियांकडे आकर्षण वाढू लागते. खरंतर घरात मूल असताना पती-पत्नी दोघांचे प्राधान्यक्रम बदलतात. मूल ही त्यांची पहिली प्राथमिकता असते. विशेषतः स्त्रिया, मुलांच्या जन्मानंतर, त्या पूर्णपणे व्यस्त होतात आणि त्यांच्या पतीकडे कमी लक्ष दिलं जातं. अशा परिस्थितीत पुरुष अनेकदा इतर महिलांकडे आकर्षित होऊ लागतात.
शारीरिक समाधान न मिळणं
पती-पत्नीचे नाते घट्ट करण्यासाठी मानसिक समाधानाबरोबरच शारीरिकरित्या समाधानी असणेही गरजेचे आहे. जेव्हा पती किंवा पत्नी शारीरिकदृष्ट्या एकमेकांकडून समाधानी नसतात, तेव्हा हळूहळू ते भावनिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर जाऊ लागतात. अशा परिस्थितीत त्यांच्या नात्यात तिसरी व्यक्ती सहज येऊ शकते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, या सर्व कारणांमुळे पुरुष आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होऊ शकतो. योग्य वेळी संवाद आणि समजूतदारपणानेच या समस्या सोडवणे शक्य आहे.