Yogurt Benefits : दररोज करा दह्याचे सेवन, होतील आरोग्यदायी फायदे

| Updated on: May 30, 2021 | 12:39 AM

दहीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, लॅक्टोज सारखे रासायनिक पदार्थ भरपूर प्रमाणात आढळतात. (Consume yogurt daily, there will be health benefits)

Yogurt Benefits : दररोज करा दह्याचे सेवन, होतील आरोग्यदायी फायदे
दही
Follow us on

नवी दिल्ली : दही हा प्रत्येक घरात सहज उपबल्ध असणारा पदार्थ आहे. दही खाणे शरीरासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये अनेक पौष्टिक तत्वे असतात. जी आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच बर्‍याच व्याधींपासून दूर ठेवते. दहीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, लॅक्टोज सारखे रासायनिक पदार्थ भरपूर प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी आवश्यक मानले जातात. म्हणून, उन्हाळ्यात दही खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे प्रत्येक घरात दही वापरले जाते. (Consume yogurt daily, there will be health benefits)

लंचमध्ये एक वाटी दही समाविष्ट करा

दुपारी दही खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. आपल्या लंचमध्ये एक वाटी दह्याचा समावेश करा. यामुळे आपल्या शरीरात आवश्यक पौष्टिक पदार्थांची कमतरता भरुन निघेल.

वजन कमी करण्यास फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी दही फायदेशीर मानले जाते. दही लो फॅट असल्याने यामध्ये उच्च प्रथिने देखील आढळतात, जी शरीराचे वजन नियंत्रित ठेवतात. म्हणून दही खाण्याचा सल्ला दिला जातो. आपण रायता किंवा लस्सी बनवूनही दही वापरू शकता.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

दही खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. कारण दह्यामध्ये प्रोबायोटिक्स पोषक तत्वे आढळतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. काही लोकांना दूध प्यायला आवडत नाही, असे लोक रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी दही खाऊ शकतात.

पचनक्रिया चांगली राहते

दररोज दह्याचे सेवन केल्यास आपली पचन क्रिया चांगली राहते. म्हणून, दररोज एक वाटी दही खाणे फायदेशीर मानले जाते. याशिवाय दह्यामुळे पोट साफ राहते, त्यामुळे दिवसभर पचन क्रिया निरोगी ठेवते. म्हणून, सकाळी किंवा दुपारी दही खाण्याचा सल्ला दिला जातो.

गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होते

गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या ही आज एक सामान्य गोष्ट झाली आहे. परंतु ही समस्या दूर करण्यात दही खूप उपयुक्त मानले जाते. कारण दहीमध्ये असे घटक असतात जे गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करतात. म्हणून, दररोज आहारात दही खाणे चांगले मानले जाते.

रक्तदाब नियंत्रित करते

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दहीचे सेवन करणे चांगले मानले जाते. दह्यामध्ये पर्याप्त प्रमाणात पोटॅशियम असते, जे रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त मानले जाते. ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो ते दही खाऊ शकतात.

आरोग्य चांगले राहते

उन्हाळ्याच्या काळात दही खाणे पुरुषांसाठी फायदेशीर मानले जाते. एका संशोधनानुसार दही पुरुषांमध्ये वीर्य गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. याशिवाय दहीमुळे पुरुषांचे आरोग्यही बळकट होते. दही आपल्याला बर्‍याच रोगांपासून दूर ठेवते. म्हणून पुरुषांना दहीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

तणाव कमी होतो

धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. ज्यामुळे अनेकदा ताण येतो. दहीचे सेवन केल्याने ताण टाळता येतो. ताण कमी करण्यासाठी दही उपयुक्त मानले जाते. कारण दही खाल्ल्याने शरीरात उर्जा मिळते. ज्यामुळे थकवा आणि तणाव येत नाही. म्हणून, जे लोक जास्त काम करतात त्यांना दहीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. (Consume yogurt daily, there will be health benefits)

इतर बातम्या

भंडाऱ्यात आसलपाणी तलावावर मंगोलियाचे पक्षी, डोळ्याचे पारणे फेडणारे विहंगम दृश्य

हायवेवर वाहन चालवण्यापूर्वी नवीन नियम जाणून घ्या, पैसे वाचणार आणि विनामूल्य प्रवास होणार