मुंबई : उन्हाळ्यात घाम आणि शरीराला येणारा घाणेरडा वास टाळण्यासाठी आपण विविध प्रकारच्या ब्रँडचे परफ्यूम वापरतो. हल्ली महिला आणि पुरुषांसाठी विविध ब्रँडचे परफ्युम बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परफ्युमच्या एक-दोन स्प्रेमुळे केवळ शरीरातून येणारा वासच जात नाही तर इतरांना भेटताना शरीराच्या दुर्गंधीमुळे तुम्हाला लाज वाटण्याची वेळ येत नाही. परंतु मार्केटमध्ये विकण्यात येणारे डियो आणि परफ्यूम तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत हे आपणास माहिती आहे काय? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या परफ्युममध्ये अशी अनेक रसायने आहेत जी तुम्हाला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे शिकार बनवू शकतात. (Consumption of more perfume can be an invitation to cancer, know how it is dangerous for health)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की परफ्युम तयार करण्यासाठी आणि त्याचा सुगंध बराच काळ टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या अनेक प्रकारच्या रसायनांचा वापर करतात, ज्यामुळे जर आपण त्यांच्या संपर्कात आला तर आरोग्याशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात. या परफ्युम आणि डियोमध्ये अनेक प्रकारचे सिंथेटिक पदार्थ देखील मिसळले जातात, ज्यामुळे त्वचेला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते. दिवसातून दोन ते चार वेळा वापरत असलेल्या अत्तरामुळे तुमचे किती नुकसान होत आहे याचा विचार करा.
परफ्युममध्ये वापरल्या जाणार्या रसायनांना हार्मोनल असंतुलन आणि त्वचेची अॅलर्जी होणे ही सामान्य बाब आहे. ही रसायने आपल्या त्वचेच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला जळजळ जाणवू लागते. काही रसायने खूप धोकादायक असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेवर पुरळ, वंध्यत्व आणि कर्करोग सारख्या गंभीर रोगांचा त्रास होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, फ्थेलेट्स, मस्क कीटोन आणि फॉर्मल्डिहाईड यासारख्या रसायनांचा वापर यामध्ये केला जातो. अनेक देशांनी फ्थेलेट्सच्या वापरावर बंदी घातली आहे. यामुळे लक्ष केंद्रीत होण्यास समस्या, मेंदूच्या विकासाशी संबंधित समस्या तसेच मज्जासंस्थेशी संबंधित रोग होण्याचा धोका असतो. या व्यतिरिक्त, मस्क कीटोन ऊतक आणि ब्रेस्ट मिल्कमध्ये सहजतेने विरघळते, ज्यामुळे नवजात बालकाला अनेक प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. (Consumption of more perfume can be an invitation to cancer, know how it is dangerous for health)
Irfan Pathan Corona : सचिन, युसूफ पाठोपाठ इरफान पठाणही कोरोना पॉझिटिव्ह! https://t.co/04jVmOrEwM @IrfanPathan @iamyusufpathan @BCCI #IrfanPathan #yusufpathan #SachinTendulkar #coronapositive #CoronaUpdate #IndianCricketer
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2021
इतर बातम्या
आदिवासी कामकाज मंत्रालयामार्फत 3479 शिक्षकांची भरती, निवासी शाळांमध्ये एकलव्य मॉडेल नेमणार
76 वर्षांनंतर दिल्लीत तापमानात रेकॉर्ड ब्रेक नोंद, मार्चमध्येच पारा 40 अंशांच्या पार