रिकव्हर झाल्यानंतर मासिक पाळीवर परिणाम करतोय कोरोना, ‘या’ समस्यांनी महिला हैराण!

| Updated on: Jan 04, 2021 | 12:05 PM

कोरोनातून रिकव्हर झालेल्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात प्रचंड त्रास झाला आहे.

रिकव्हर झाल्यानंतर मासिक पाळीवर परिणाम करतोय कोरोना, ‘या’ समस्यांनी महिला हैराण!
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूचा अनेक प्रकारे लोकांच्या आरोग्यावर परिणाम केला आहे. अलीकडेच, अशी काही प्रकरणे आढळली आहेत ज्यामध्ये कोरोनातून रिकव्हर झालेल्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात प्रचंड त्रास झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बर्‍याच काळापासून कोरोनामुळे त्रस्त असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळी संबंधित समस्यांमध्ये गुंतागुंत अधिक वाढली आहे (Corona affecting on women’s menstrual cycle after recovery).

स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर देखील याचा प्रभाव पडला आहे. त्याचबरोबर मासिक पाळीच्या समस्येतदेखील गुंतागुंत निर्माण झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या स्त्रियांमध्ये मानसिक ताण आणि तणावपूर्ण जीवन यासारख्या समस्या देखील समोर आल्या आहेत.

‘या’ समस्या समोर आल्या…

कोरोनामधून बरे झाल्यानंतर काही स्त्रियांना मासिक पाळीत अनियमिततेची समस्या उद्भवली आहे. काही स्त्रियांना मासिक पाळी आलीच नाही, तर काहींना जास्त रक्तस्त्राव आणि वेदनांना सामोरे जावे लागले आहे. काही महिलांना रक्ताच्या गाठी आणि मूड स्विंग्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तणाव हे त्रासाचे मुख्य कारण

तथापि, या बाबतीत तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. काहीजणांनी असे म्हटले आहे की, कोरोनाचा थेट मासिक पाळीशी काहीही संबंध नाही. त्याऐवजी, त्यांच्यात कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे त्यांना हार्मोनल समस्या उद्भवल्या असून, त्यामुळेच मासिक पाळीचा त्रास निर्माण झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याच वेळी, काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूमुळे महिलांच्या अंडाशयांवर देखील परिणाम होतो आहे. परंतु, जसजसे कोव्हिडमधून शरीर सावरण्यास सुरुवात होते, तसतसे सर्व समस्या देखील हळू हळू सुरू होत आहेत (Corona affecting on women’s menstrual cycle after recovery).

पिरियड्सचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

– जेव्हा तुम्हाला पिरियड्स येणार असतील, त्यापूर्वी एक आठवडा मनुके आणि केसर पाण्यात भिजवून खावेत.

– तुमच्या डायटमध्ये दररोज मोड आलेले कडधान्य उकडून खा किंवा एक फळ खा.

– दर आठवड्याला कमीत कमी दोनदा कंदमूळ म्हणजे रताळे किंवा सूरण खा.

– दर आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम करा.

– पीरियड्सदरम्यान रात्री झोपण्यापूर्वी कॅल्शियम सप्लीमेंट घ्या.

– पिरियड्सदरम्यान कोमट पाण्याची पिशवी पोटाजवळ ठेवावी.

पीसीओडीवर उपाय

दरम्यान, मासिक पाळीमुळे उद्भवणारा पीसीओडी हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. यासाठी जीवनशैलीत सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. यासाठी हाय कोलेस्ट्रॉल, हाय फॅट आणि हाय कार्बोहायड्रेट युक्त आहार टाळा. दररोज एक तास नियमित व्यायाम करा. यामुळे वजन नियंत्रित राहील. तसेच डॉक्टरांनी काही औषधे दिली असतील तर, ती वेळेवर घ्या. याद्वारे पीसीओडीची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते.

(Corona affecting on women’s menstrual cycle after recovery)

हेही वाचा :