मुंबई : सध्याचे तरूण-तरूणी रिलेशनशीपमध्ये येण्याअगोदर एकमेकांना नीट जाणून घेण्यासाठी डेटवर जातात. डेटवर जाण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतोच. पण जर तुम्ही पहिल्यांदाच डेटवर जात असाल तर खास करुन मुलांनी या गोष्टी लक्षात घेणंं महत्त्वाचं आहे, कारण मुली डेटवर मुलांच्या या गोष्टी हमखास नोटीस करतात.
पहिली डेट खूप स्पेशल आणि खास असते. डेटवर जायचं असेल तर प्रत्येकजण खास तयारी करून जात असतो. कारण या डेटमध्ये आपल्याला भावी आयुष्यातील जोडीदार किंवा जोडीदाराच्या अनेक गोष्टी लक्षात येतात. पण पहिली डेट असल्यामुळे एक्साईटमेंट असते.
जर तुम्ही पहिल्यांदा डेटवर जात असाल तर सर्वात आधी तुम्ही त्या व्यक्तीची पर्सनॅलिटीबद्दल जाणून घ्या, की त्याची बोलण्याची शैली कशी आहे. तो ओरडून तर बोलत नाही ना? तो तुमचं मत ऐकायचं सोडून स्वतःचं बोलण्याचा प्रयत्न करत आहे का? या सर्व गोष्टींमधून समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत समजते.
डेटवर गेल्यावर तरूणाची बॉडी लँग्वेज कशी आहे. तुम्ही तिच्याकडे कशा पद्धतीने पाहत आहात? तुम्ही तिचं बोलणं ऐकत आहे का? ती रिलॅक्स आणि कम्फर्टेबल आहे का? तरूणाची बॉडी लँग्वेज कशी आहे? मुली हे सर्व नोटीस करतात.
तुम्ही ज्या मुलीसोबत डेटवर गेला आहात तिचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. स्वभाव जाणून घेण्यासाठी, मुली गार्ड किंवा वेटर यांसारख्या इतर लोकांशी तुम्ही कसे वागता हे त्या पाहतात. काहीजण अशा लोकांशी नीट वागत नाहीत. कारण उद्या तुम्ही तिच्यासोबतही असे वागण्याची भीती तिला असते.
तुमची खाण्याची पद्धत देखील त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे हे सांगते. तुम्ही एकदम वेगाने खात असेल किंवा पदार्थ खाली सांडत असेल तर ते चांगलं नाही. या गोष्टीचा तुमच्या नात्यावर परिणाम होत नाही, पण तुमच्या खाण्याच्या पद्धतीवरही तुमचे व्यक्तिमत्व दिसून येतं. तुमच्याकडे मॅनर्स आहेत की नाहीत हेही दिसून येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गेला असाल तर या गोष्टींची काळजी नक्की घ्या.