नवी दिल्ली – आजकाल बऱ्याच लोकांच्या घरात क्रॅनबेरीजचा (cranberry) ज्यूस आढळतो. लाल रंगाचे हे छोटंस फळ आपल्या आरोग्यासह त्वचेसाठीही (beneficial for health and skin) खूप फायदेशीर आहे. क्रॅनबेरीज हे अनेक महत्वपूर्ण पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत आहे. आज आपण क्रॅनबेरीच्या फेस मास्कबद्दल (cranberry facemask) जाणून घेऊया, ज्यामुळे आपली त्वचा उजळू शकते. व्हिटॅमिन, मिनरल्स, अँटी-ऑक्सीडेंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे भरपूर प्रमाणत असलेल्या क्रॅनबेरीज या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून होतो बचाव
क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे त्वचेवरील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात. फ्री रॅडिकल्स हे असे रेणू आहेत ज्यामुळे पेशींचे नुकसान होऊन अकाली वृद्धत्व येऊ शकते. क्रॅनबेरीचा वापर हा तुमच्या त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतो.
व्हिटॅमिन सी राखते
क्रॅनबेरीजमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ते कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. कोलेजन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे, ज्यामुळे त्वचेची लवचिकता कायम राहते.
अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध
एका अहवालातील माहितीनुसार, क्रॅनबेरीजमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल (बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे) स्किन बेनिफिट्स आढळतात. त्यामुळे त्वचेवर होणारे इन्फेक्शन कमी करण्यास मदत मिळते. क्रॅनबेरीजचा फेस मास्क कसा उपयोगी आहे ते जाणून घेऊया.
क्रॅनबेरी आणि मधाचा फेसपॅक
आपल्या त्वचेसाठी क्रॅनबेरी आणि मध हे एक योग्य व उत्तम कॉम्बिनेशन ठरू शकते. थोड्या क्रॅनबेरीज मिक्सरमधून बारीक करून एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये एक त दोन चमचे मध घाला. ते मिश्रण नीट एकत्र करून तुमचा चेहरा, मान आणि त्वचेवर लावावे आणि सुमारे 20 मिनिटे हा फेसपॅक राहू द्यावा. त्यानंतर चेहरा व मान साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हे मिश्रण अथवा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येईल.