सायनाइडपेक्षा 1200 पट जास्त घातक असतो हा मासा; नीट शिजवला नाही तर खाताच होईल मृत्यू

| Updated on: Jan 05, 2025 | 5:21 PM

असा एक पदार्थ आहे जो नीट शिजवलं नाही जर तो तसाच खाल्ला तर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. हा पदार्थ सायनाइडपेक्षा 1200 पट जास्त घातक असल्याचंही म्हटलं जातं. तसेच 20 ते 35 हजार रुपये या डिशची किंमत असते.

सायनाइडपेक्षा 1200 पट जास्त घातक असतो हा मासा; नीट शिजवला नाही तर खाताच होईल मृत्यू
Follow us on

आपण अनेकदा असं ऐकलं असले की अमूक एक पदार्थ नीट शिजवून खा नाहीतर पोटात दुखेल किंवा एखाद्या मांसाहाराचा पदार्थ नीट न शिजता कच्चा राहिला तर नक्कीच पोटात दुखतं. असं आपण बऱ्याचदा ऐकतो. पण असा एक पदार्थ आहे जो नीट शिजवला गेला नसेल आणि आपण तसच जर खाल्लं तर मृत्यूही होऊ शकतो.

विषारी पदार्थ कोणाता? 

होय, हा पदार्थ इतका विषारी मानला जातो की तो जर नीट शीजवला नाही, अन् तसाच तो खाण्यात आला तर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. हा पदार्थ म्हणजे एक प्रकारचा मासा आहे.

जगाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात. त्यापैकी एक असा पदार्थ जो फक्त निवडक लोकच शिजवू शकतात आणि तयार करू शकतात. जर ते नीट शिजवून खाल्ले नाही तर काही मिनिटांतच माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

जपानी डिश फुगु जगातील सर्वात विषारी अन्न

हा मासा म्हणजे जपानी डिश फुगु आहे. हा मासा म्हणजे जगातील सर्वात विषारी अन्न मानले जाते. ही डिश पेपरफिशपासून तयार केली जाते, ज्यामध्ये सायनाइडपेक्षा कितीतरी पट जास्त विष असतं असं म्हटलं जातं. एका पेपरफिशमध्ये इतके विष असते की ते 30 लोकांचा जीव घेऊ शकतो.

मासा सायनाइडपेक्षा 1200 पट जास्त घातक

कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सेफ्टीच्या अहवालानुसार ,जपानमधील फुगू हे जगातील सर्वात विषारी अन्न आहे. त्याला जपानी पफरफिश असंही म्हणतात. पफरफिश हा एक अत्यंत विषारी मासा आहे. ज्याच्या आत टेट्रोडोटॉक्सिन आढळते. या माशाच्या अंडाशय, आतडे आणि यकृतामध्ये जास्तीत जास्त टेट्रोडोटॉक्सिन असते.

हे एक न्यूरोटॉक्सिन आहे, जे सायनाइडपेक्षा 1200 पट जास्त घातक मानलं जातं. हे इतके विषारी असतं की, सुईच्या टोकाच्या आकाराप्रमाणेही एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गेलं तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. एका फुगू माशामध्ये इतकं विष असतं की ते 30 लोकांचा जीव घेऊ शकते.असं म्हटलं जातं.

मासा बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि परवाना आवश्यक

जपानमधील अनेक रेस्टॉरंट्स फुगू डिश बनवतात आणि ही डिश केवळ खास प्रशिक्षित शेफद्वारे तयार केली जाते. प्रत्येकजण हा जपानी पदार्थ बनवू शकत नाही. ते करण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि परवाना आवश्यक आहे. परवाना मिळवण्यासाठी शेफना अनेक वर्षांचं प्रशिक्षणही घ्यावं लागतं.

डिशची 3500 ते 20 हजार रुपये किंमत

विशेष म्हणजे फुगू डिश खूप महाग आहे साधारणपणे त्याची किंमत 3500 ते 20 हजार रुपयांपर्यंत असते. काही प्रीमियम रेस्टॉरंटमध्ये, फुगू डिशची किंमत 35 हजार रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. त्याची किंमत जास्त आहे कारण ती अनुभवी शेफने तयार केलेली असते. अत्यंत काळजीपूर्वक ही डीश बनवली जाते.

या किमतीमध्ये साशिमी, सूप आणि ग्रील्ड फुगू सारख्या विविध फुगू पदार्थांचा समावेश आहे. फुगुची चव चांगली आहे, ज्यामुळे लोकांना ते खूप आवडतं. आणि ही डिश तेवढी फेमसही आहे. लोकं फार आवडणीने ही डिश खातात.

आपल्या भारतात हा मासा किंवा ही डिश मिळत नसली तरीही अशा पद्धतीचाही मासा मिळतो किंवा तो इतका विषारी असू शकतो ही माहिती नक्कीच आश्चर्य वाटणारी आहे. तसेच कधी तुम्ही जपानमध्ये गेलात तर ही फुगू डिश तुम्हालाही आठवेल एवढं नक्की.