मुंबई : गर्भधारणेदरम्यान शरीरात होणार्या सर्व बदलांच्या दरम्यान स्त्रियांना बर्याच समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत काही स्त्रिया गर्भधारणेदरम्यान मधुमेहाच्या शिकार ठरतात. गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या या मधुमेहाला ‘जेस्टेशनल डायबिटीस’ असे म्हणतात. यामध्ये, स्त्रियांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. तथापि, ही समस्या तात्पुरत्या स्वरुपाची असते आणि बाळाच्या जन्मानंतर त्याचे निराकरण होते. परंतु, यामुळे प्रसूतीमध्ये बर्याच अडचणी येऊ शकतात (Diet meal plan for Gestational Diabetes women).
खरं तर, ‘जेस्टेशनल डायबिटीस’ दरम्यान, बर्याच वेळा आईच्या रक्तामध्ये वाढलेला ग्लूकोज प्लेसेंटामधून बाळाच्या रक्तात जातो, ज्यामुळे बाळाच्या रक्तातील साखर देखील वाढते आणि त्याच्या मज्जासंस्थेमध्ये बिघाड होतो. यासह स्पाइना बिफिडिया, गाऊट, मूत्राशय किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत रोगाचा धोका वाढतो. म्हणूनच, या समस्येचा योग्य प्रकारे उपचार केला गेला पाहिजे. याशिवाय डॉक्टरांच्या सूचनांचे अनुसरण केले पाहिजे. याचबरोबर आपल्या आहाराची देखील विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून प्रसूतीच्या वेळी स्त्रीला कोणतीही अडचण येऊ नये, आणि त्यामुळे बाळाला काही त्रास होऊ नये.
– मधुमेहाच्या दरम्यान व्हिटामिन सी समृध्द फळे खावीत. अशा परिस्थितीत आवळा, लिंबू, संत्रे, मोसंबी, टोमॅटो इत्यादी खाणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय बेरी, खरबूज, कलिंगड, नाशपाती, सिंघाडा, पेरू, किवी आणि स्ट्रॉबेरी खाणे देखील फायदेशीर आहे.
– मोड आलेले मूग व हरभरा यांचा आहारात समावेश करा. याशिवाय चणे, दुधी, दोडका, सलगम, पालक, बाथुआ, गाजर, सोया, मेथी इत्यादी भाज्या खा. यामुळे हिमोग्लोबिन देखील वाढेल.
– उपाशी राहू नका, थोड्या-थोड्या वेळात काहीतरी खाणे चालू ठेवा. फळ आणि सलाड या व्यतिरिक्त आपण ओट्स, दलिया, ब्राऊन ब्रेड, उपमा इत्यादी पदार्थ देखील खाऊ शकता. जे पचायला हलके आणि पौष्टिक देखील आहेत. घरी बनवलेले सूप प्या (Diet meal plan for Gestational Diabetes women).
– आंबा, केळी, चिकू, बटाटा, जिमीकंद आणि रताळे यासारख्या गोष्टी खाणे टाळा. वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचे अजिबात सेवन करू नका.
– चटणी, लोणचे, तयार पदार्थ आणि बाटली बंद ज्यूस टाळा. याशिवाय केक, पेस्ट्री, आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंकसुद्धा घेऊ नका.
– वेळोवेळी लघवीमधील केटोन अॅसिडची तपासणी करा.
– रक्तातील साखरेची पातळी सतत तपासून घ्या.
– वजन नियंत्रित करा आणि आहाराची काळजी घ्या. शक्य असल्यास, डॉक्टरांकडून आहार योजना बनवून घ्या.
– कोल्ड ड्रिंक्स, पेस्ट्री आणि मिठाईसारख्या गोड पदार्थांपासून दूर रहा.
– तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करा अथवा चाला.
– आपल्या आहारात कृत्रिम साखर सामील करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Diet meal plan for Gestational Diabetes women)
Gestational Diabetes | गर्भात वाढत असलेल्या बाळाला हानी पोहचवू शकतो Gestational Diabetes, जाणून घ्या या आजाराबद्दल…#GestationalDiabetes | #Diabetes | #Preganancy | #health https://t.co/lkWYqQTOh2
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021