दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा…दसरा संपला की घरोघरी दिवाळीचे वेध लागतात. भारतातच नवहे तर परदेशातही अनेकजण दिवाळी उत्साहात साजरी करतात. वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतु्र्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, आणि भाऊबीज.. असा भरगच्चा कार्यक्रम असतो दिवाळीचा. घरी साफसफाई करून कंदील लावून, पणत्या , दिवे प्रज्लवित करून, फटाके फोडून आणि छान मिठाई-फराल बनवून घरोघरी हा सण उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशाची तसेच देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वतीची पूजा करून सुख-समृद्धी, संपत्तीची, चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. दिवाळीच्या सजावटीसाठी नेहमी बाहेरूनच सामान आणायची गरज नाही, कधीकधी तुम्ही घरच्या घरीही सजावटीचे सामान तयार करू शकता.
पेपर वॉल हँगिग
रंगीबेरंगी कागद वापरून तुम्ही घरच्या घरी पेपर वॉल हँगिग बनवू शकता. याच्या मदतीने तुम्ही फुलाचे दिवे, मोर आणि इतर अनेक प्रकारची डिझाईन्स बनवू शकता आणि त्याद्वारे दरवाजे आणि भिंती सजवू शकता. कागद, कृत्रिम फुले आणि शुभ दिपावली असं लिहूल तुम्ही तोरण बनवू शकता.
कागदी कंदील
दिवाळी म्हटलं की दिवे आणि कंदील यांना अनन्यसाधारण महत्व.बाजारातून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी कागदी कंदील बनवू शकता. तुम्ही ते वेगवेगळ्या आकारात आणि आकारात बनवू शकता. त्याच्या आत लाइट्स बसवता येतात. हाताने केलेले कंदीलही उत्तम दिसतात.
हाताने रंगवलेले दिवे, पणत्या
दिवाळीला घराबाहेर आवर्जून दिवे, पणत्या लावल्या जातात. तुम्ही साधे दिवे रंगवून आकर्षक बनवू शकता आणि हे दिवे सजावटीसाठी वापरू शकता. याशिवाय तुम्ही स्टोन, मिरर आणि ग्लिटरचाही वापर करू शकता.
पूजेची थाळी / ताम्हन
आजकाल बरेच लोक बाजारातून पूजेची थाळी विकत घेतात. पण पूजेची ही थाळी किंवा ताम्हन तुम्ही घरीच सजवू शकता. यासाठी एक ताटली किंवा ताम्हन घेऊन त्यावर बॉर्डरवर गोटा किंवा लाल रंगाचे कापड वापरू शकता. तसेच त्याच्या कडा या फुलांनी देखील सजवू शकता. याशिवाय त्या थाळीत किंवा ताम्हनात दिवा लावून त्याभोवती फुले, गोटा किंवा रिबन लावू शकता. याशिवाय गोटा, रिबन किंवा रंगांच्या साहाय्याने प्लेटमध्ये स्वस्तिक बनवता येऊ शकतं.