नवी दिल्ली – आपल्या केसांची (hair care) योग्य पद्धतीने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण केसांची नीट काळजी घेतली नाही तर ते पूर्णपणे खराब (hair damage) होतात, ज्यामुळे केसगळतीही सुरू होते. मात्र काही लोक केस शांपूने धुतल्यानंतर (hair wash)काही चुका करतात ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. केस ओले असताना कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊया.
केस ओले असताना या चुका टाळाव्यात
ओले केस विंचरू नयेत
केस ओले असताना विंचरू नयेत कारण तसे केल्याने केस तुटतात. हे खरं आहे. केस धुतल्यावर ते ओले असताना त्यांची मुळं थोडी कमकुवत होतात, त्यामुळे ओले केस विंचरले तर ते मुळापासून तुटतात. त्यामुळे लक्षात ठेवा की केस व्यवस्थित सुकल्यानंतरच विंचरावेत. जर तुम्हाला ओले केस विंचरायचे असतीलच तर जाड कंगवा वापरावा.
ओले केस बांधू नयेत
ओले केस अजिबात बांधू नयेत. यामागचे कारण म्हणजे तुम्ही तुमचे केस पोनीटेलमध्ये बांधता तेव्हा ते खेचले जातात, अशावेळी ते पटकन तुटू शकतात. म्हणूनच केस पूर्णपणे वाळल्यानंतर त्यातील गुंता सोडवून ते नीट विंचरून मग बांधावेत.
हेअर स्प्रे
बरेच लोक ओल्या केसांवर हेअर स्प्रेचा वापर करतात, परंतु हे टाळले पाहिजे. कारण यामुळे केस खराब होऊ शकतात. त्यामुळे केस पूर्णपणे वाळल्यानंतरच त्यावर हेअर स्प्रेचा वापर करावा.
ओले केस टॉवेलमध्ये बांधू नका
अनेकांना केस ओले असताना ते टॉवेलमध्ये बांधण्याची सवय असते. पण असे करू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये बांधल्याने ते खराब होतात व तुटतात. म्हणूनच केस ओले असतील तर टॉवेलने पुसून पूर्णपणे कोरडे करा.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)