Anti-Aging Diet । चाळीशीनंतर या गोष्टींचे करा सेवन रहाल दीर्घकाळ निरोगी

| Updated on: Feb 21, 2021 | 3:26 PM

Anti-Aging Diet । चाळीशीनंतर या गोष्टींचे करा सेवन रहाल दीर्घकाळ निरोगी (do these things to stay healthy for a long time)

Anti-Aging Diet । चाळीशीनंतर या गोष्टींचे करा सेवन रहाल दीर्घकाळ निरोगी
आहारात या सहा भाज्यांचा अवश्य समावेश करा; आरोग्यासाठी लाभदायी ठरू शकते
Follow us on

मुंबई : शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार आवश्यक आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे एका विशिष्ट वयानंतर काय खावे आणि काय खाऊ नये याची माहिती असणे. बदलत्या वयाबरोबरच खाण्यापिण्यातही बदल करणे आवश्यक आहे. कारण चाळीशीनंतर आपले शरीर कमकुवत होण्यास सुरवात होते, विशेषत: स्त्रियांची हाडे खूपच कमजोर होऊ लागतात. यासाठी आहारात सहज पचण्यायोग्य पदार्थांचा समावेश असावा. आहारात अँटी-ऑक्सीडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असलेले पदार्थ खावे. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ सुंदर आणि तरुण दिसाल. वाढत्या वयाबरोबर आपली रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होत जाते. यामुळे आपण लवकर आजारी पडतो आणि शरीरातील मांसपेशीही कमजोर होऊ लागतात. यासाठीच वाढत्या वयासोबत आहारातही बदल करीत पोषक पदार्थांचा समावेश करावा. (do these things to stay healthy for a long time)

डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश

1. हिरव्या भाज्या
भाज्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानल्य जातात. पालक, ब्रोकली सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. यात केवळ विटामिन आणि मिनरल्स नसतात तर अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे तुम्हाला चाळीशीनंतर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

2. डाळिंब
डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. आयर्नसह अनेक प्रकारचे विटामिन आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

3. शिमला मिरची
शिमला मिरची अँटी-ऑक्सिडंट आणि विटामिन सी ते चांगले स्त्रोत आहे. हे डाएटमध्ये समाविष्ट करुन शरीर चाळीशीनंतरही निरोगी ठेवता येते.

4. गाजर
गाजरमध्ये विटामिन सी अधिक असते, जे दीर्घायुष्य मिळण्यासाठी मदत करते. गाजर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती बळकट होते. मजबूत रोगप्रतिकारशक्ती शरीराचा विविध संक्रमणापासून बचाव करण्यास मदत करते.

5. अक्रोड
वाढत्या वयासोबत डाएटमध्ये बदल केले पाहिजे. डाएटमध्ये अक्रोडचा समावेश केला पाहिजे. अक्रोडमधील पोषक तत्वं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. (do these things to stay healthy for a long time)

 

 

इतर बातम्या

LIC पॉलिसीधारकांसाठी मोठी बातमी, बंद पडलेली पॉलिसी नियमित करण्यासाठी विशेष अभियान

मधुमेह, बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्यासाठी करा द्राक्षाचे सेवन, जाणून घ्या लाभदायक फायदे