मुंबई : सध्याचे धावपळीचे लाईफस्टाईल, वाढते वय, खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्याची तसेच सौंदर्याचीही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. त्वचेची काळजी नीट घेत नसल्यामुळे त्वचेसंबंधीत अनेक समस्यां उद्भवतात. आपली निरोगी आणि स्वच्छ त्वचा ही खरी सुंदरता आहे. परंतु वाढती वय आणि काही सवयींमुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्याची समस्या सुरू होते. सुरकुत्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण रोज झोपण्याआधी काही खास गोष्टींची काळजी घेतली तर त्वचेसंबंधी समस्या दूर होण्यास मदत होईल. (Do this remedy to get rid of wrinkles, the skin will look beautiful)
बहुतेक लोकांना पोटावर किंवा एका कुशीवर झोपण्याची सवय असते. परंतु जेव्हा आपण आपल्या पोटावर किंवा कुशीवर झोपता तेव्हा आपला चेहरा आणि उशीचा संपर्क येतो. यामुळे उशीवर उपस्थित जंतू चेहऱ्याच्या संपर्कात येतात आणि सुरकुत्या येतात. म्हणूनच आपण नेहमी पाठीवर झोपावे.
आपले उशीचे कव्हर नियमितपणे बदलणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जंतू व घाण आपल्या त्वचेच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी होते. जर आपण उशांच्या कव्हरचे फॅब्रिक मऊ ठेवले तर चांगले होईल.
झोपेच्या आधी अल्कोहोल घेतल्यानेही सुरकुत्या होण्याची समस्या वाढू शकते. मद्यपान केल्यामुळे आपल्या चेहऱ्याभोवती फ्लूइड गोळा होते ज्यामुळे सुरकुत्या अधिक दिसतात.
त्वचेवरील पोषण कमी झाल्यास सुरकुत्या होण्याची समस्या उद्भवते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम किंवा आय क्रीमचा वापर करा. हे त्वचेला मॉईश्चराईज करेल आणि त्वचा निरोगी होईल.
चेहर्यासमोर एअर कंडिशनर किंवा कूलर असू नये. कूलर किंवा एसीसमोर त्वचा डिहायड्रेट होऊ शकते आणि यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे अधिक सुरकुत्या होतात. (Do this remedy to get rid of wrinkles, the skin will look beautiful)
सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांच्या नावे सुसाईड नोट, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा शेतात गळफास#Suicide #Gondia https://t.co/SplJ6EzqSu
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2021
इतर बातम्या
एका लग्नाची भलतीच गोष्ट! नवरीच्या दारी आल्या दोन वराती; एकाच्या गळ्यात वरमाला, दुसऱ्यासोबत नांदायला!