नवीन अभ्यासात झोपेच्या गुणवत्तेबाबत (Regarding sleep quality) माहिती समोर आली आहे. जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत त्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या गुणवत्तेसोबतच त्याच्या कालावधीचीही काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा लोकांच्या झोपेच्या चक्रात मोठी समस्या दिसून आली आहे. अनेकांना रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय असते. ही सवय सामान्य वाटू शकते, परंतु तिचे आरोग्यावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम (negative results) होऊ शकतात.
आरोग्य तज्ञ म्हणतात, कुठल्याही परिस्थिती प्रत्येकाची रात्री 6-8 तास झाली पाहिजे. यासाठी, सकाळी 10 ते 6 पर्यंत झोपण्याची वेळ ही सर्वात दर्जेदार झोप मानली जाते. परंतु, बहुतेकदा असे दिसून येते की, बहुतेक लोक रात्री 12-1 वाजता झोपतात. ही सवय तुमच्या झोपेचे चक्र विस्कळित करते. ज्यामुळे तुम्हाला झोपेच्या कमतरतेमुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या (health problems) निर्माण होण्याचा धोका असतो. जाणून घेऊया रात्री उशिरा झोपण्याचे काय तोटे आहेत?
झोपेच्या चक्रातील व्यत्ययामुळे उच्च रक्तदाबाची समस्या होते. अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात, संशोधकांना असे आढळून आले की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागत राहतात त्यांना इतर लोकांपेक्षा उच्च रक्तदाब होण्याचा धोका जास्त असतो. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, या साध्या सवयीमुळे तुमचे चयापचय चक्र देखील विस्कळित होऊ शकते. ज्यामुळे अनेक समस्यांचा धोका असतो.
उशिरा झोपणाऱ्यांनाही नैसर्गिकरित्या सकाळी उशिरा उठण्याची सवय असते, त्यामुळे अशा लोकांना सकाळी व्यायाम करणे अनेकदा कठीण जाते. जर्नल हेल्थ प्रमोशन अँड क्रॉनिक डिसीज प्रिव्हेन्शनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की, उशीरा झोपणाऱ्यांना इतर लोकांच्या तुलनेत सुस्त जिवन शैली(इनॲक्टिव्ह) समस्या होण्याची शक्यता असते, ज्याचा एकूण आरोग्यावर खूप नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, उशीरा झोपण्याच्या सवयीमुळे तुमच्या आहाराच्या वेळेवरही परिणाम होतो, ज्याचा थेट परिणाम वजन वाढण्याच्या समस्येवर होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उशीरा झोपल्याने, सकाळी नाश्त्याची वेळ चुकण्याची शक्यता अधीक असते. या व्यतिरिक्त, संपूर्ण आहार चक्रावर देखील याचा परिणाम होतो. या सवयीमुळे वजन प्रभावित होऊ शकते, अशा लोकांमध्ये वजन वाढण्याचा-लठ्ठपणाचा धोका दिसून येतो. जो अनेक प्रकारच्या रोगांसाठी एक प्रमुख जोखीम घटक आहे.