नवी दिल्ली | 14 ऑगस्ट 2023 : मध (Honey) हा आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. त्यामध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे शरीराला अनेक लाभ मिळतात. मधामध्ये ग्लूकोज, अपोषक अमीनो ॲसिड इत्यादी पोषक घटक आढळतात. पण गरजेपेक्षा जास्त मधाचे सेवन करणे हे आपल्या तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते. अधिक प्रमाणात मध खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच आरोग्याच्या इतर समस्याही यामुळे निर्माण होऊ शकतात. मध खाण्याचे साईड-इफेक्ट्स (Honey Side Effects) जाणून घेऊया.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक
मधामध्ये साखर व कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. जर तुम्हू गरजेपेक्षा जास्त मध खाल्लात तर त्यामुळे ब्लड शउगर वाढू शकते. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांनी एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त मध करू नये.
पोटाच्या समस्या
जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रासला असाल तर आहारात मधाचा कमी प्रमाणात समावेश करावा. मधाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने डायरिया सारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात.
वजन वाढू शकते
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर खाण्या-पिण्यात मधाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अतिशय गरजेचे आहे. कारण त्यामध्ये कॅलरीज, साखर आणि कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन वाढू शकते.
दात किडू शकतात.
मधामध्ये नैसर्गिक साखर असते, पण त्याचे प्रमाणही अधिक असते. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त मध खाल्लात, तर तुम्हाला दातांसंदर्भातील काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याच्या अतिरिक्त सेवनामुळे दात किडू शकतात.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)