नवी दिल्ली : उन्हाळा येताच बाजारात आंब्याच्या (Mangoes) घमघमाटाने वातावरण मोहरून जातं. असे खूपच कमी लोक असतील ज्यांना आंबा खायला आवडत नसेल. पण साधारणपणे आंबा खाताना आपण त्याची सालं (mango peels) आणि बी किंवा आंब्याची कोय टाकून देतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आंबा जितका रसाळ आणि मधुर असतो, तितकीच फायदेशीर त्याची सालंही (benefits of mango peels)असतात. त्याचे इतके फायदे आहेत, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आज आपण आंब्याच्या सालीचे फायदे जाणून घेऊया.
आंब्याची साले आरोग्यासाठी फायदेशीर असतात
सुरकुत्यांपासून आराम मिळेल
ज्यांना चेहऱ्यावर नको असलेल्या सुरकुत्यांचा त्रास आहे त्यांच्यासाठी आंब्याची साल रामबाण उपाय म्हणून काम करू शकते. यासाठी प्रथम आंब्याची साल वाळवून घ्यावी. नंतर ती बारीक वाटून घ्या आणि त्यात गुलाबपाणी मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी. हे नियमितपणे लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात आणि चेहरा अधिक चमकतो.
कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो
आंब्याच्या सालीमध्ये असे बरेच नैसर्गिक घटक आढळतात, ज्यामुळे शरीरात मृत पेशींची वाढ थांबते. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. एवढेच नाही तर शरीर स्लिम-ट्रिम राहते.
आंब्याच्या सालीमध्ये हे गुणधर्म आढळतात
आंब्याच्या सालीमध्ये कॉपर, फोलेट आणि जीवनसत्त्वे, B6, A आणि C मुबलक प्रमाणात आढळतात. या सालींमध्ये मुबलक प्रमाणात फायबर देखील आढळते. ज्याचा वापर सेंद्रिय खत म्हणून केला जातो.
पिंपल्सपासून मिळते मुक्ती
उन्हाळ्यात चेहऱ्यावर मुरुमे आणि पुरळ येणं सामान्य गोष्ट आहे. या पिंपल्सवर आंब्याची साल लावल्याने यापासून कायमची सुटका होऊ शकते. यासाठी प्रथम आंब्याची साल बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. आणि नंतर ते पिंपल्सवर लावा. काही दिवसातच तुम्हाला मुरुमांपासून मुक्ती मिळेल असे दिसेल.
अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध
आंब्याच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासूनही संरक्षण करते. माहितीसाठी सांगतो की, हे फ्री रेडिकल्स डोळे, हृदय आणि त्वचेसाठी खूप धोकादायक असतात. आंब्याच्या सालीच्या मदतीने तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.