Excessive sweating Causes : उन्हाळ्यात प्रचंड उकाड्यामुळे आणि पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे घाम येणं (sweating) हे नॉर्मल आहे. पण जर तुम्हाला प्रत्येक ऋतूत कोणत्याही कारणाशिवायच घाम येत असेल किंवा रात्री घाम येत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. कारण हे अनेक गंभीर ते अनेक गंभीर आजारांचे संकेत देत असते. या आजारांबद्दल वेळीच कळले किंवा त्यांचे वेळीच निदान झाले तर ते उत्तम ठरते, अन्यथा भविष्यात त्रास वाढू शकतो.
जास्त घाम येण्यामागे कोणते आजार असू शकतात, किंवा ते कोणत्या आजारांचे लक्षण असू शकते हे आपण जाणून घेऊया. जेणेकरून त्यावर वेळीच उपचार करणं शक्य होईल.
कोणत्या आजारांमध्ये येतो सर्वाधिक घाम ?
ओव्हरॲक्टिव्ह थायरॉईड
जर एखाद्या व्यक्तीला थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीला खूप जास्त घाम येऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती मेनोपॉज, मधुमेह किंवा हृदयरोग अशा किंवा थायरॉईड ग्लँड डिसऑर्डरचा सामना करत असेल तर त्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त घाम येऊ शकतो.
मधुमेह
ज्यांना मधुमेह असतो, त्या व्यक्तीच्या शरीरातून ॲड्रेनालाइन हार्मोन्स रिलीज होऊ लागतात, त्यामुळेही त्या व्यक्तीला खूप जास्त घाम येऊ लागतो. जर तुम्हाला खूप जास्त घाम येण्याचा त्रास असेल तर एकदा तुमची ब्लड शुगर टेस्ट नक्की करून पहा.
स्ट्रेस
स्ट्रेस हा कोणताही आजार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हे नक्की समजून घ्या की तणावाचा किंवा स्ट्रेसचा आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त तणाव येत असेल किंवा स्ट्रेसचा सामना करावा लागत असेल तर अशा परिस्थितीतही सामान्य प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो.
नर्व्हस सिस्टीम डिसऑर्डर
या समस्यांशिवाय मज्जातंतू किंवा मज्जासंस्थेशी संबंधित कोणताही आजार असला तरीही जास्त घाम येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हालाही अवेळी आणि ठराविक प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल किंवा तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर एकदा तपासणी करून घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)