मुंबई : नवीन वर्ष सुरू झालं की तरुणाई फेब्रुवारी महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचं कारण म्हणजे व्हेलेंटाईन विक (Valetine Week) सुरू होतो. फेब्रुवारी महिना उजेडताच महाविद्यालयीन तरुणाईला व्हेलेंटाईन डे (Valetine Day) सह व्हेलेंटाईन विकची ओढ लागलेली असते. 7 फेब्रुवारी पासून ते 14 फेब्रुवारी पर्यन्त हा सप्ताह असतो. तरुणाईमध्ये मोठी धामधूम बघायला मिळत असते. याच काळात गुलाबाच्या फुलांना मोठं महत्व असतं. त्याचे कारण म्हणजे गुलाबाच्या फुलाला (Rose Day) प्रेमाचे (Love) प्रतीक मानलं जातं. आणि व्हेलेंटाईन विकची सुरुवातही रोझ डे पासूनच सुरू होते. याच काळात तरुण-तरुणी एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपलं प्रेम व्यक्त करत असतात.
व्हेलेंटाईन विक ची सुरुवात ही रोझ डे पासून सुरुवात होते. त्यामुळे कोणत्या रंगाचे फूल द्यावे असा संभ्रम अनेकांच्या मनात असतो. कोणत्या रंगाचे फूल दिले तर त्याचा अर्थ काय असाही प्रश्न पडत असतो.
व्हेलेंटाईन विक मधील कोणत्या दिवशी कोणता डे असतो हे बहुतांश जणांना माहिती असते. पण व्यक्ती नुसार फूल कोणत्या रंगाचे असायला हवे याबाबत फारशी माहिती नसते.
तुम्ही गुलाबाच्या फुलांचा गुच्छ द्या किंवा एखादं फूल द्या याने काही फरक पडत नसतो. मात्र, ते फूल कोणत्या रंगाचे आहे याचा नक्कीच फरक पडत असतो. त्याचे कारण म्हणजे त्या गुलाबाचा रंग कोणता आहे हे अधिक महत्वाचे असते.
साधारणपणे गुलाबाचे सात रंग बाजारात उपलब्ध होत असतात, त्यामध्ये लाल रंगाचे, गुलाबी रंगाचे, पिवळ्या रंगाचे, केशरी रंगाचे, सफेद रंगाचे, काळ्या गुलाब, जांभळ्या रंगाचे गुलाब असतात.
गुलाबाचा रंग आणि त्यामागील अर्थ काय –
1) लाल रंगाचा गुलाब – लाल रंगाचा गुलाब हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा गुलाब दिला जातो, प्रेम करत असलेल्या व्यक्तीला लाल रंगाचा गुलाब दिला जातो. हनिमूनच्या रात्रीलाही लाल रंगाचा गुलाब दिला जातो.
2) गुलाबी रंगाचा गुलाब – गुलाबी रंगाचा गुलाब हा दिसायला खूपच सुंदर असतो, त्याचप्रमाणे त्याचा अर्थ देखील खूपच चांगला आहे. एखाद्याचे आभार किंवा जिवलग व्यक्तीला तुम्ही गुलाबी रंगाचा गुलाब देऊन व्यक्त होऊ शकतात.
3) पिवळ्या रंगाचा गुलाब – पिवळ्या रंगाचा गुलाब हा मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो. कुणाशी मैत्री करायची असल्यास तुम्ही पिवळा गुलाब देऊ शकतात, त्याने तुमचा गुलाब स्वीकारला तर त्याने तुमची मैत्री स्वीकारली असा अर्थ होतो.
4) केशरी रंगाचा गुलाब – केसरी रंगाच्या गुलाब हा कुणाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी असतो. कुणी आवडत असेल आणि त्याचे पुढे तुम्हाला जायचे असेल तर केशरी रंगाचा गुलाब दिला जातो, मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाण्यासाठी केशरी रंगाचे फूल देतात.
5) सफेद रंगाचा गुलाब – सफेद रंगाचा गुलाब हा शांततेचे प्रतीक आहे. कुणाशी तुमचे वाद झाले असतील किंवा बोलणं बंद असेल तर सफेद रंगाचा गुलाब देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकतात. हे फूल समोरील व्यक्तीने स्वीकारले तर तुमचा वाद मिटला असा त्याचा अर्थ होतो. क्षमा करण्यासाठी हा गुलाब वापरतात.
6) काळ्या रंगाचा गुलाब – काळ्या रंगाचा गुलाब नाते संपविण्यासाठी असतो. जर अचानक तुम्हाला कुणी काळ्या रंगाचा गुलाब दिला तर त्याला तुमच्यासोबत नाते संपवायचे आहे. याशिवाय नातं तोडण्यासाठी काळ्या रंगाच्या गुलाबाचा वापर करतात.
7) जांभळ्या रंगाचे गुलाब – जांभळ्या रंगाचे गुलाब तुम्ही जर तुम्हाला पहिल्याच नजरेत कुणी आवडले असेल तर त्याला देऊ शकतात आणि भावना व्यक्त करू शकतात. जांभळ्या रंगाचा गुलाब पाहताच क्षणी आवडणारी किंवा घायाळ करणाऱ्या व्यक्तीला देऊ शकतात.