टॅटू काढताना घ्या काळजी, नाहीतर होईल हे नुकसान

| Updated on: Jul 08, 2023 | 5:42 PM

टॅटू काढण्याची क्रेझ सध्या वाढत असून त्यासाठी योग्य काळजी घेतली पाहिजे. अन्यथा संसर्ग होण्याा धोका वाढतो.

टॅटू काढताना घ्या काळजी, नाहीतर होईल हे नुकसान
Image Credit source: freepik
Follow us on

Disadvantages of tattooing : अंगावर टॅटू काढण्याची (tattoo) आता फॅशन झाली आहे. बहुसंख्य लोक शरीरावर टॅटू काढताना दिसतात. पाश्चिमात्य देश असो किंवा कुठेही, आजकाल भारतातही टॅटूचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. इथे बहुतांशी लोक नेहमी टॅटू काढतात, मात्र त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक त्यांच्या आवडीचे किंवा श्रद्धेशी संबंधित टॅटू काढून घेतात. पण बऱ्याच लोकांना त्याचे दुष्परिणाम माहीत नसतात. तज्ज्ञांच्या मते, यामुळे व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

टॅटू गोंदवण्याचे तोटे जाणून घेऊया

  • हेल्थलाइनच्या बातमीनुसार, टॅटू काढताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतो. गोंदवून घेतल्याने व्यक्तीला एचआयव्हीची लागण होण्याचा धोका असतो आणि अशा केसेस समोरही आल्या आहेत. टॅटू काढताना नवी सुई वापरली जाईल, याची खात्री करून घ्या.
  • शरीरावर टॅटू काढल्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोकाही असू शकतो. अर्थात, ही गोष्ट आजपर्यंत सिद्ध झालेली नाही, परंतु टॅटूच्या शाईमध्ये असलेले काही हानिकारक घटक देखील कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात.
  • शरीरावर टॅटू काढल्याने रक्तजन्य आजार वाढण्याचा धोका असतो. सुई शेअर करणे, हेही त्यामागचे कारण असू शकते. यासाठी टॅटू काढताना स्वच्छता, नवीन सुई, रंग हे नवे व चांगल्या स्थितीतील आहेत ना याची काळजी घ्या. तसेच टॅटू बनवणाऱ्या व्यक्तीने हातमोजे घातले आहेत की नाही, या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे उत्तम असते. एकापेक्षा जास्त वेळा सुई वापरणे हे संसर्गाचा धोका वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
  • टॅटू शाईमुळे कोणत्याही व्यक्तीला ॲलर्जी होऊ शकते. यामुळे तुम्हाला भविष्यातही त्रास होऊ शकतो. टॅटू काढलेल्या जागी खाज सुटणे, पुरळ उठणे असा त्रासही होऊ शकतो.
  • शरीरावरील टॅटू तुम्हाला अनेक प्रकारे त्रास देू शकतात. त्यामुळे टॅटू काढताना योग्य काळजी घेणे, जागरूक राहणे महत्वाचे ठरते. टॅटूमुळे स्टेफिलोकोसी संसर्गासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये त्वचेमध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियामुळे संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीलाही होऊ शकतो. पाणी येणे आणि फोड येणे अशी त्याची लक्षणे दिसू शकतात. तसेच टॅटू काढलेल्या ठिकाणी खाज सुटणे आणि सूज येऊ शकते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी टॅटू काढणे टाळावे.