मुंबई : मुली बर्याचदा फॅशन सेन्सनुसार ड्रेसेस मिक्स करतात आणि स्टाईलिश दिसण्याचा प्रयत्न करतात. तुम्हालासुद्धा नवीन लुकसह तुमचे कॅज्युअल जॉगर्स वापरायचे असतील तर आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. या टीप्सचा वापर करून तुम्ही हिवाळ्यातही जॉगर्ससह स्टाईलिश आणि फन्की दिसू शकता.
पांढऱ्या टी-शर्टसोबत जॉगर्स
तुम्हाला जिन्स आणि लेगिंग्जसारखे ड्रेस परिधान करणं आवडत नसेल तर तुम्ही जॉगर्ससह स्वत: ला आरामदायक आणि स्पोर्टी लुक देऊ शकता. मित्रांसोबत बाहेर जाताना किंवा वर्कआउट करतानासुद्धा तुम्ही जॉगर्स वापरू शकता.
जर वातावरण फार थंड नसेल तर तुम्ही हे कपडे दैनंदिन जीवणातही वापरू शकता. तुम्ही स्नीकर्ससोबतही हा लूक कॅरी करू शकता.
डेनिम जॅकेटसोबत जॉगर्स
तुम्ही हिवाळ्यात सेमी कॅज्युअल ट्राय करू शकता. डेनिम कधीही ऑफट्रेंड जात नाही, त्यामुळे तुम्ही जॉगर्ससोबत स्टायलिश डेनिम जॅकेट कॅरी करू शकता.
जॉगर्स आणि हाय हील बूटसध्या जॉगर्स आणि हाय हील बूटचा ट्रेंड सुरू आहे. तुम्ही न्यूट्रल कलरच्या बूटसोबत हा लुक कॅरी करू शकता.
ओव्हरकोटसोबत जॉगर्स
हिवाळ्यात ओव्हरकोट लूकचा ट्रेंड असतो. तुम्ही ओव्हरकोट आणि लाइट स्वेटरसोबत हे कॅरी करू शकता. या लुकसोबत तुम्ही स्निकर्स किंवा बूट कॅरी करा.
मोनोक्रोम लुक
बॉलिवूड कलाकारांना तुम्ही मोनोक्रोम लूकमध्ये बर्याचदा पाहिलं असेल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्वेटशर्ट, क्रॉप हूडी आणि टर्टल नेक स्वेटरचं काँबिनेशन करू शकता. मित्रांना भेटण्यासाठी आणि ट्रॅव्हलिंगसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
संबंधित बातम्या
Fitness Goal | ताणतणावापासून दूर राहण्यासाठी शिल्पा शेट्टी घेते व्यायामाचा आधार, पाहा व्हिडीओ…
Dry Shampoo | हिवाळ्यात ड्राय शॅम्पूचा वापर ठरेल हानिकारक, वाचा याचे दुष्परिणाम