नवी दिल्ली – जेव्हा केसांच्या समस्यांचा उल्लेख येतो तेव्हा मनात सर्वप्रथम विचार येतो तो कोंड्याच्या (dandruff problem) समस्येचा. सहसा प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी हा त्रास सहन करावाच लागतो. थंडीच्या दिवसात तर कोंड्याची समस्या आणखीनच वाढते. कोरडा स्काल्प (dry scalp) आणि केसांची योग्य रितीने काळजी न घेतल्यास असे होऊ शकते. यासाठी आपण अनेक प्रकारचे उपायही करतो, त्यातीलच एक उपाय म्हणजे केसांना तेल (oiling hair)लावणे आहे. मात्र केसांना तेल लावल्याने कोंडा अजून वाढतो की नाही, याबद्दल लोकांच्या मनात नेहमी संभ्रम असतो. त्यामुळे खरं काय आहे आणि कोंड्याचा त्रास असताना केसांना तेल लावावे की नाही हे जाणून घेऊया.
तेल लावल्यामुळे केसांमधील कोंडा वाढतो का ?
तेल लावणे हे केसांच्या आरोग्यासाठी व वाढीसाठी चांगले असते, पण त्यामुळे खरंच कोंडा वाढू शकतो का? तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अनेक व्यक्तींच्या टाळूवर (स्काल्प) टाळूमध्ये कोंडा असतो. ते बरेच आठवडे केसांना तेल लावत नाहीत आणि त्यामुळे केसामधील कोंडा आणखी वाढू शकतो.
तज्ज्ञांनी सांगितले कारण
तज्ज्ञांच्या सांगण्यावनुसार, तेल हे कोंड्यासाठी धोकादायक आहे असे वाटत असेल तर तो चुकीचा विचार आहे. केसांना आठवड्यातून एकदा तरी तेल लावावे. याशिवाय अशा तेलाची निवड करावी, ज्यामध्ये कोंडा दूर करणारे घटक असतात. तेलामुळे कोरड्या टाळूपासून आराम मिळतो आणि रक्ताभिसरणही सुधारते. ज्यामुळे कोंड्याचा त्रास कमी होतो.
कोंड्याचा त्रास कमी करण्यासाठी करा हे उपाय
कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि लिंबाचा घरगुती उपाय करू शकता. आठवड्यातून एकदा तरी केसांवर हे मिश्रण लावावे. त्यासाठी अर्धा कप दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. काही वेळाने केस कोमट पाण्याने धुवा. हे नियमितपणे केल्यास 2 ते 3 आठवड्यांत फरक पडेल.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)