CHILD CARE | तुमचं मूल वारंवार लघवी करतंय?, दुर्लक्ष करू नका, या आजाराची असू शकतात लक्षणे

| Updated on: Mar 25, 2021 | 8:00 AM

लहान मुलांमध्ये वारंवार लघवीची समस्या येणे खूप सामान्य आहे. परंतु जर ते रात्रीपेक्षा दिवसा जास्तवेळा लघवी करत असतील तर ही पोलॅकिरियाची चिन्हे आहेत. त्यामुळे काळजी घ्या आणि पोलकिरीयाचा धोका टाळा. (Does your child urinate frequently, Don't ignore it, there may be symptoms of this disease)

CHILD CARE | तुमचं मूल वारंवार लघवी करतंय?, दुर्लक्ष करू नका, या आजाराची असू शकतात लक्षणे
तुमचं मूल वारंवार लघवी करतंय?, दुर्लक्ष करू नका
Follow us on

मुंबई : मुले लहानपणी अंथरूणात लघवी करतात. ही खरंतरं सर्वसामान्य गोष्ट. पण जर तुमचे मूल वारंवार लघवी करीत असेल मग ते अंथरुणात असो वा बाथरुममध्ये. याकडे दुर्लक्ष करू नका. यात टेन्शन करण्यासारखे काही नाही, असे समजू नका. कारण ही गोष्ट तुमची चिंता वाढवणारी ठरू शकते. जी मुले दिवसा वारंवार लघवी करतात, त्यांना काही आजाराचे लक्षण असते. ही समस्या 3 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सामान्य आहे. परंतु कधीकधी हे यापेक्षा मोठ्या मुलांमध्ये देखील पाहिले जाते. मुलांमध्ये वारंवार लघवी होणे पोलाकिरीया नावाच्या आजारामुळे असू शकते. यामध्ये मुलास नेहमीपेक्षा जास्त लघवी होते. बहुतांश वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की मुलांना लघवी कंट्रोल होत नाही. बाथरूममध्ये पोहचण्याआधीच लघवी बाहेर येते. (Does your child urinate frequently, Don’t ignore it, there may be symptoms of this disease)

पोलाकिरीयाची लक्षणे

1. मूल दर अर्ध्या तासाने लघवी करण्यासाठी जाते.
2. कधीकधी एखाद्याला दिवसातून 40 वेळा जावे लागते.
3. प्रत्येक वेळी लघवी करण्यासाठी जाताना थोडी थोडी लघवी होणे

तज्ज्ञांच्या मतानुसार पोलाकिरियाची काही संभाव्य कारणे

1. मुलाला प्रथमच शाळेत जाण्याची भीती
2. मुलाची छेडछाड
3. नवीन ठिकाणी स्थलांतरीत होणे
4. घरात नवीन बाळाचे आगमन
5. पालकांमधील मतभेदांमुळे मुलाच्या मनात भीती
6. शरीरात रासायनिक बदल
7. मुलांनी जास्त मीठ खाणे
8. एंग्जाइटी डिसऑर्डर
9. लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढणे
10. वारंवार लघवी करण्याविषयी विचार करणे
11. जास्त प्रमाणात दूध किंवा कॅफिन घेतल्यानेही समस्या उद्भवते.
12. मूत्राशय अधिक सक्रिय झाल्यामुळे पोलकिरीया होतो.

या गोष्टींकडे कानाडोळा करू नका

1. लघवी करताना आपल्या मुलास कोणतीही वेदना जाणवते.
2. तुमच्या मुलाच्या लघवीचा रंग जाड आणि गंधरस आहे.
3. मुलाला कपड्यांमध्ये लघवी होते.
4. आपल्या मुलाचे वजन खूपच कमी झाले असेल.
5. मूल पूवीर्पेक्षा अधिक द्रवपदार्थ पित असेल तर लक्ष द्या. म्हणजेच मुलाला जास्त तहान लागते.

पालकांनी ही काळजी घ्यावी

– वारंवार बाथरूममध्ये जाणे चांगले नसल्याचे मुलांना पटवून द्या
– मुलाला आवडत्या व्यंगचित्रांमध्ये व्यस्त ठेवा.
– मुलासाठी समुपदेशन किंवा थेरपी करा.
– पालकांनी मुलाला सांगितले पाहिजे की त्याला कोणताही मोठा आजार झालेला नाही. (Does your child urinate frequently, Don’t ignore it, there may be symptoms of this disease)

इतर बातम्या

पुरुषांमध्ये सर्वात आधी ‘ही’ गोष्ट पाहतात महिला, नंतरच घेतात निर्णय

चांगले आरोग्य पाहिजे आहे तर दिवसातून एक केळी खा!